शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

ठाण्यात आंतरशालेय मिनी मॅरेथॉन स्पर्धेत चिन्मय चौहान अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 19:50 IST

ठाणे : मुकंद स्पोर्ट्स आयोजित क्रीडा महोत्सवाला रविवारी सुरुवात झाली असून, या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी झालेल्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेतील मुलांच्या गटात चिन्मय चौहान तर मुलींच्या गटात परिणा खिल्लारी यांनी अव्वल स्थान पटकावत, आंतरशालेय मिनी मॅरेथॉन स्पर्धेवर नाव कोरले आहे.हिरानंदानी विद्यालयाच्या चिन्मय चौहानने अवघ्या एक सेकंदाच्या फरकाने आॅक्सफर्ड इंग्लिश स्कूलच्या सुमित ...

ठळक मुद्देमुकंद स्पोर्ट्सचा क्रीडा महोत्सवमुलींच्या गटात परिणा खिल्लारी जिंकली

ठाणे : मुकंद स्पोर्ट्स आयोजित क्रीडा महोत्सवाला रविवारी सुरुवात झाली असून, या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी झालेल्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेतील मुलांच्या गटात चिन्मय चौहान तर मुलींच्या गटात परिणा खिल्लारी यांनी अव्वल स्थान पटकावत, आंतरशालेय मिनी मॅरेथॉन स्पर्धेवर नाव कोरले आहे.हिरानंदानी विद्यालयाच्या चिन्मय चौहानने अवघ्या एक सेकंदाच्या फरकाने आॅक्सफर्ड इंग्लिश स्कूलच्या सुमित खिल्लारीला मागे टाकत मुकंद लिमिटेडच्या मुकंद स्पोर्ट्स क्लब आयोजित ३.५ किलोमीटर अंतराच्या आंतरशालेय मिनी मॅरेथॉन स्पर्धेत मुलांच्या गटात अव्वल स्थान पटकावले. चिन्मयने १२ मिनिट १९ सेकंदात हे अंतर पार केले. सुमितने त्याच्यापाठोपाठ १२ मिनिट २० सेकंद घेऊन दुसरे स्थान मिळवले. स्वामी विवेकानंद हायस्कूलचा अंकीत चौहानने १२ मिनिट ३० सेकंद अशी वेळ नोंदवत तिसरे स्थान पटकावले. अंकितपाठोपाठ स्वामी विवेकानंद हायस्कूलचे अनिश सियाराम आणि दीपक प्रजापती अनुक्र मे चौथ्या आणि पाचव्या स्थानी राहिले.मुलींमध्ये आॅक्सफर्ड इंग्लिश स्कूलच्या परिणा खिल्लारी हिने समाधानकारक अंतर राखत पहिले स्थान पटकावले. परिणाने ३.५ किलोमीटरचे अंतर १३ मिनिटे २८ सेकंदात पूर्ण केले. हेच अंतर पार करण्यासाठी दुसºया स्थानी राहिलेल्या होलीक्र ॉस कॉन्व्हेंटच्या इशिका इंगळेला १४ मिनिटे २ सेकंद एवढा वेळ लागला. मुलांच्या शर्यतीप्रमाणे मुलींमध्येही तीन ते पाचव्या क्र मांकापर्यंत एकाच शाळेच्या विद्यार्थिनींनी बाजी मारली. राधिकाबाई मेघे विद्यालयाच्या श्रावणी गुजर (१४ मिनिट ६ सेकंद), सिद्धी वंजारे (१४ मिनिटे १० सेकंद ) आणि रिद्धी शेंडे (१४ मिनिट १२ सेकंद ) अनुक्र मे तिसºया, चौथ्या आणि पाचव्या स्थानी राहिले. या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत वीस शाळांमधील सुमारे १४०० धावपटू सहभागी झाले होते. स्पर्धेतील विजेत्यांना एमआयडीसी रबाळे पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत काटकर, मुकंद स्पोर्ट्स क्लबचे उपाध्यक्ष पी. सतीश, सहउपाध्यक्ष अरु ण पिसे, सचिव राजेश पवार यांच्या हस्ते रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.

टॅग्स :thaneठाणेSportsक्रीडाSchoolशाळा