Apurva Patil's silver medal for the Games India contest | खेलो इंडिया स्पर्धेत ठाण्याच्या अपूर्वा पाटीलला रौप्यपदक
खेलो इंडिया स्पर्धेत ठाण्याच्या अपूर्वा पाटीलला रौप्यपदक

ठळक मुद्देठाणे शहरातून एकमेव ज्युदोपटू म्हणून निवड१७ वर्षांखालील गटात रौप्यपदकठाणे : नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियम येथे गुरुवारी खेलो इंडिया स्कूल स्पर्धेत ज्युदो प्रकारात ठाण्याच्या सरस्वती क्रीडासंकुलच्या अपूर्वा पाटील हिची महाराष्टÑ संघात निवड झाली होती. ठाणे शहरातून एकमेव ज्युदोपटू म्हणून निवड झालेल्या अपूर्वाने मिळालेल्या संधीचे सोने करून १७ वर्षांखालील गटात रौप्यपदकावर आपले नाव कोरले. या पदकामुळे महाराष्टÑाच्या खात्यात एका पदकाची भर पडली आहे. या गटात विविध राज्यांतील तब्बल १६ खेळाडू सहभागी झाल्याची माहिती तिचे प्रशिक्षक देवीसिंग रजपूत यांनी दिली.


Web Title: Apurva Patil's silver medal for the Games India contest
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.