सायन्स पार्कच्या जागी चिल्डे्रन अन् ट्रॅफिक पार्क
By Admin | Updated: April 25, 2017 00:07 IST2017-04-25T00:07:13+5:302017-04-25T00:07:13+5:30
शहरातील लहान मुले, नागरिक आणि सर्व प्रकारच्या वाहनधारकांना वाहतुकीचे सुरक्षित व सुरळीत नियमन माहीत होण्यासाठी

सायन्स पार्कच्या जागी चिल्डे्रन अन् ट्रॅफिक पार्क
घोडबंदर : शहरातील लहान मुले, नागरिक आणि सर्व प्रकारच्या वाहनधारकांना वाहतुकीचे सुरक्षित व सुरळीत नियमन माहीत होण्यासाठी तसेच वाहतूक नियमांची आणि त्यांची अंमलबजावणी कशी करावी, यासाठी ठाणे महापालिका कासारवडवली-कावेसर सेक्टर-६ मध्ये चिल्ड्रेन व ट्रॅफिक पार्क उभे करत आहे.
पूर्वी मंजूर झालेला सायन्स पार्कप्रकल्प रद्द करून हा नवीन प्रकल्प तयार करण्यात येत आहे. अमृत योजनेचे अनुदान एक कोटी, महापालिका निधी एक कोटी आणि प्रायोजक दोन कोटी असे एकूण चार कोटी खर्च करून प्रकल्प बांधण्यात येणार आहे. इम्प्रेस पार्कसमोर या प्रकल्पाचे काम सुरू असून अडीच एकरांत प्रकल्प होत आहे. उर्वरित आठ एकरांत गार्डनचे काम होणार आहे. वृक्ष प्राधिकरणाने येथे मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केलेली आहे. या पार्कमध्ये सिग्नलचा वापर, लेन मार्किंग, झेब्रा क्र ॉसिंगचा उपयोग, रस्त्याच्या दुतर्फा असलेली दिशादर्शक माहितीपर फलके, स्पीड लिमिट, वाहनधारकास माहिती देण्याबरोबरच प्रात्यक्षिके, प्रदर्शन, लेक्चर, वर्कशॉप, सेमिनार्स, वाहतूक समस्येवरील प्रकल्पीय कामकाजासाठी दालन, पथनाट्य यासाठी रूम, प्रशासकीय कार्यालय आदी या प्रकल्पात उभारण्यात येणार आहे. (वार्ताहर)