एकतर्फी प्रेमातून तरूणीची आत्महत्या
By Admin | Updated: May 10, 2017 00:14 IST2017-05-10T00:14:52+5:302017-05-10T00:14:52+5:30
आपल्याच नात्यातील एका मुलाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून शृनाली जाधव या २४ वर्षीय तरूणीने आत्महत्येचा प्रयत्न केला.

एकतर्फी प्रेमातून तरूणीची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : आपल्याच नात्यातील एका मुलाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून शृनाली जाधव या २४ वर्षीय तरूणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. गेली दोन दिवस तिची मृत्यूसोबत सुरु असलेली झुंज अखेर संपुष्टात आली. एकतर्फी प्रेम करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल प्रीतम शेवाळे या तरुणाविरुद्ध बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शृनाली आपल्या कुटुंबासह बदलापूर पूर्वेत राहत होती. तिचा मावसभाऊ प्रीतम तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. तो तिच्या घरी अनेकदा येत असे आणि फोनवरूनही लग्न करण्यासाठी शृनालीला दमदाटी करून मानसिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून अखेर तिने १३ एप्रिल रोजी राहत्या घरी गळफास घेतला. तिला तत्काळ उल्हासनगरच्या खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तीन दिवसांनी १६ एप्रिलला तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात ही बाब निष्पन्न झाली.