शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरड्याला मारहाण प्रकरण: उल्हासनगरातील प्लेग्रुप शाळेची मनसेकडून तोडफोड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 17:59 IST

अवैधपणे चाललेल्या प्लेग्रुपवर कारवाईची मागणी 

सदानंद नाईक, उल्हासनगर : कवितेवर टाळ्या वाजवीत नसल्याच्या रागातून, ३ वर्षाच्या चिमुरड्याला शिक्षिकेकडून मारहाण झाल्याचा प्रकार उघड होऊन विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सोमवारी मनसे शिष्टमंडळाने प्लेग्रुप संचालकाला याबाबत जाब विचारून प्लेग्रुप ची तोडफोड करण्यात आली. अश्या अवैधपणे चालणाऱ्या प्लेग्रुपवर कारवाई करण्याची मागणी मनसेचे जिल्हाप्रमुख बंडू देशमूख यांनी केली. 

उल्हासनगर कॅम्प नं-४, गुरुनानक शाळेजवळू एक्सलेंट प्लेग्रुप मध्ये ३ वर्षाच्या चिमुरड्याने कवितेवर टाळ्या वाजविल्या नाही म्हणून शिक्षिकेकडून मारहाण झाल्याचा प्रकार उघड झाला. पालकांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात शिक्षिकेवर गुन्हा दाखल झाला. सोमवारी महापालिका प्रशासन अधिकारी दिपक धनगर यांनीही प्लेग्रुपला भेट दिल्यानंतर, मनसेच्या शिष्टमंडळाने प्लेग्रुप संचालकाला झालेल्या घटणेबाबत जाब विचारून संचालकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. यावेळी संतप्त झालेल्या मनसे सैनिकांनी प्लेग्रुपची तोडफोड केली. तसेच विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून संचालकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. 

उल्हासनगर व अंबरनाथ मध्ये प्ले ग्रुपच्या नावाखाली अनेक अनाधिकृत शाळा चालवल्या जात असल्याचा आरोप मनसे जिल्हाप्रमुख बंडू देशमूख यांनी केला. अशा प्लेग्रुप मधील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी बंधनकारक करण्यात यावी. तसेच या शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक व कर्मचारी हे मानसिक दृष्ट्या सक्षम असल्याचा प्रमाणपत्र सक्तीचं करण्यात याव. अश्या कडक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे देशमूख म्हणाले. प्लेग्रुपची तोडफोड करण्यात आल्यावर, अश्या अवैधपणे चालविलेल्या प्लेग्रुपची अशीच तोडफोड करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. मनसेचे शहरप्रमुख संजय घुगे यांच्यासह असंख्य पदाधिकारी यावेळी उपस्थितीत होते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरMNSमनसेSchoolशाळा