शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून बाळाचे अपहरण :गलथान कारभाराविरुद्ध मनसेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 20:56 IST

ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अवघ्या चार तासांच्या बाळाचे अपहरण झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देरविवारी पहाटे ३.३० वाजताची घटनाबाळ चोरणारी महिला सीसीटीव्हीमध्ये कैददोन पथकांमार्फत ‘त्या’ महिलेचा शोध सुरु

ठाणे : अवघ्या चार तासांच्या बाळाचे विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयातून अपहरण झाल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. बाळाची आई मोहिनी मोहन भोवर (१९, रा. भिवंडी) हिने याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून रुग्णालयाच्या या गलथान कारभाराविरुद्ध मनसेने जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करून या घटनेचा निषेध नोंदवला.सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बाळाचे अपहरण करणा-या या महिलेचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. भिवंडीच्या आदिवासीपाड्यात वास्तव्यास असलेल्या मोहिनी यांना भिवंडीतील इंदिरा गांधी स्मृती रु ग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले होते. त्या वेळी तेथील रुग्णालय प्रशासनाने त्यांना ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले होते. शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तिला ठाण्याच्या रुग्णालयात दाखल केले. तिने रात्री ११ वाजण्याच्या सुमारास नैसर्गिक प्रसूतीने मुलाला जन्म दिला. रविवारी पहाटे ३.३० ते ४ वाजण्याच्या सुमारास तिच्या आईने बाळाला मागितल्याचा बहाणा करून एका अनोळखी महिलेने तिच्याकडून हे बाळ नेले. प्रत्यक्षात हे बाळ त्या महिलेने चोरल्याचे अर्ध्या तासाने तिच्या लक्षात आले. तिची आई आणि पती हे चहा पिण्यासाठी पहाटे ३ वाजतादरम्यान बाहेर पडले. त्याच वेळी हा प्रकार घडला. काही वेळाने प्रसूती कक्षातील परिचारिका तिच्याकडे बाळाला दूध पाजून झाले का, अशी विचारणा करण्यासाठी गेली. तेव्हा बाळाला आईकडे बाहेर पाठवल्याचे तिने सांगितले. आपण बाळाला आणण्यासाठी कोणत्याही महिलेला पाठवले नसल्याचे तिने सांगितल्यानंतर तत्काळ पोलिसांना आणि संबंधित डॉक्टरांना याबाबतची माहिती परिचारिकांनी दिली. पोलिसांनी रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून चौकशी सुरू केल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील यांनी दिली. या घटनेमुळे रुग्णालयीन सुरक्षेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे.

जिल्हा शल्यचिकित्सकांवरच गुन्हा दाखल करण्याची मागणीबाळ चोरीला गेल्याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्यामुळे अज्ञात व्यक्तीऐवजी थेट जिल्हा शल्यचिकित्सकांवरच गुन्हा दाखल करावा, तातडीने सुरक्षारक्षक नेमावेत आदी मागण्यांसाठी मनसेचे ठाणे शहर उपाध्यक्ष रवींद्र मोरे, उपशहराध्यक्ष विश्वजित जाधव, पुष्कर विचारे, जावेद शेख तसेच महेश कदम आणि आशीष डोके आदींनी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयाबाहेर रविवारी सकाळी ठिय्या आंदोलन करून या घटनेचा निषेध नोंदवला. या कारभारामध्ये सुधारणा झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही मनसेने दिला आहे.‘पहाटे ३.३० ते ४ वाजण्याच्या दरम्यान बाळाच्या अपहरणाची ही घटना घडली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे संबंधित लाल साडीमधील महिलेचा शोध घेण्यात येत आहे. यासाठी दोन पथकेही तयार केली आहेत.’-मंदार धर्माधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणेनगर

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPolice Stationपोलीस ठाणे