शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
4
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
5
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
6
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
7
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
8
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
9
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
10
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
11
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
12
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
13
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
14
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
15
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
16
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
17
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
18
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
19
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

ठाण्यात भाजपाचीही दहीहंडी, मुख्यमंत्री लावणार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 3:42 AM

केरळ पूरग्रस्तांना करणार मदत

ठाणे : ठाण्यात शिवसेना, राष्टÑवादीपाठोपाठ आता भाजपानेही दहीहंडी उत्सवात उडी घेतली आहे. ठाण्यात प्रथमच भाजपाच्या स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने हिरानंदानी मॅडोज येथे तब्बल नऊ थरांची हंडी उभारली जाणार असून यासाठी पहिले पारितोषिक ११ लाखांचे ठेवले असल्याची माहिती आयोजक शिवाजी पाटील यांनी दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती ही आकर्षण ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या उत्सवाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार विनय सहस्रबुद्धे, खासदार कपिल पाटील, भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांच्यासह सेलिब्रेटी उपस्थित राहतील.मुंबईतील सर्व गोविंदा पथकांना आमंत्रित केले असून त्यांचा विमा काढण्यात येणार आहे. ३ सप्टेंबरला सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत होणाऱ्या दहीहंडीच्या आदल्या दिवशी म्हणजे २ सप्टेंबरला सेलिब्रेटींची दहीहंडी होणार आहे. यावेळी सुशांत शेलार, शर्मिष्ठा राऊत, रूपाली भोसले, मीरा जोशी, केतकी चितळे, राधा कुलकर्णी, स्मिता शेवाळे, सिया पाटील, मधुरा देशपांडे, प्रीती सदाफुले आणि माधवी निमकर हे कलाकार तसेच अभिजित कोसंबी आणि इतर चार गायक यात सहभागी होतील.शिक्षणासाठी सात लाखांची मदतच्सामाजिक समरसता म्हणून दहीहंडीमध्ये केरळमधील पूरग्रस्त आणि महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सात लाखांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केले जाणार असल्याचे सांगितलेच्तसेच उच्च शिक्षण घेणाºया ठाण्यातील १० आदिवासी विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात येणार आहे. या उत्सवासाठी मुंबईतील सर्व गोविंदा पथकांना आमंत्रित केले असून त्यांचा विमा काढण्यात येणार आहे. तर २ सप्टेंबर रोजी सेलिब्रिटींची दहीहंडी होणार आहे.

 

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाDahi Handiदही हंडी