उल्हासनगरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स फाडले, गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Updated: February 10, 2023 17:38 IST2023-02-10T17:36:50+5:302023-02-10T17:38:24+5:30
वाढदिवसाच्या पोस्टर्समध्ये विनापरवाना नाव टाकल्यावरून पोस्टर्स फाडल्याचा प्रकार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

उल्हासनगरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स फाडले, गुन्हा दाखल
उल्हासनगर : कॅम्प नं-५ वाल्मिकीनगर मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले पोस्टर्स फाडल्याप्रकरणी दोन भावावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. वाढदिवसाच्या पोस्टर्समध्ये विनापरवाना नाव टाकल्यावरून पोस्टर्स फाडल्याचा प्रकार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरातील वाल्मिकीनगर येथे बाळासाहेबांची शिवसेनेच्या युवासेनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्टर्स लावले होते. पोस्टर्स मध्ये परवानगी न घेता फोटो लावल्याचे अमित रामप्रसाद जाजवट व जितू रामप्रसाद जाजवट यांचे म्हणणे होते. यावरून ८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री त्यानी पोस्टर्स फाडून राहुल मुकेश जाजवट याला मारहाण केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले पोस्टर्स फाडल्या प्रकरणी एकच खळबळ उडून प्रकार हिललाईन पोलीस ठाण्यात गेला. पोलिसांनी राहुल मुकेश जाजवट याच्या तक्रारीवरून अमित रामप्रसाद जाजवट व जितू रामप्रसाद जाजवट यांच्यावर गुन्हा दाखल केला. तर स्थानिक राजकारणातून माझ्या मुलांना फसवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप अमित व जितू यांचे वडील रामप्रसाद जाजवट यांनी केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.