शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

ठामपा शाळेतील विद्यार्थांना देण्यात येणाऱ्या चिक्क्यांमध्ये आळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 23:56 IST

ठाणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सकस आहारापोटी दिल्या जाणाऱ्या चिक्क्यांमध्ये अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणी स्वच्छतेबाबत आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप शहर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन शिंदे यांनी केला आहे.

ठळक मुद्देकंत्राटदारावर गुन्हा दाखल कराकाँग्रेसची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सकस आहारापोटी दिल्या जाणाऱ्या चिक्क्यांमध्ये अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या चिक्क्यांचा पुरवठा करणाऱ्या गुन्हा दाखल करून त्याची सर्व देयके थांबविण्याची मागणी ठाणे शहर (जिल्हा) काँग्रेसने केली.ठाण्यात महापालिकेच्या २०० हून अधिक शाळा असून, त्यातील सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांना सकस आहारापोटी दररोज चिक्क्या दिला जात होत्या. कोविड काळात शाळा बंद असल्याने त्याचा पुरवठा बंद झाला होता. यावेळी राजकीय हस्तक्षेप करून या चिक्क्यांचा आठवड्यातून एकदा पुरवठा करण्याचा निर्णय ठामपाच्या शिक्षण मंडळाने घेतला होता.ठामपाच्या बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक ॲड. विक्रांत चव्हाण यांनी याबाबत विषय मांडला होता. हे कंत्राट बेकायदा दिले असून, अटी-शर्तीनुसार दिलेला नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. हा कारखानाही ठाण्याऐवजी सोलापूरमध्ये आहे. ठाण्यातील एका बेकायदा बंगल्यावर या चिक्क्यांचा सर्व साठा ठेवण्यात येतो. या ठिकाणी स्वच्छतेबाबत आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप शहर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन शिंदे यांनी केला आहे.या कंत्राटदाराला ठिकठिकाणच्या शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रवास शुल्क दिले जात आहे. तेही बेकायदा असल्याची बाबही उघडकीस आली आहे. या चिक्क्यामध्ये आता चक्क अळ्या आढळल्या आहेत. याबाबत आयुक्तांची भेट घेऊन या कंत्राटदारावर त्वरित गुन्हा नोंदवावा आणि त्याची देयके त्वरित रोखण्याची मागणी करणार असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :thaneठाणेEducationशिक्षणSchoolशाळा