शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

नवीन वाहने देण्याच्या नावाखाली फसवणूक, ५४ लाखांना लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 06:47 IST

ठाणे : जुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहने देण्याचे आमिष दाखवून ग्राहकांकडून आठ वाहने घेऊन त्यांची ५४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मुरलीधर (६२) तसेच त्यांची मुले नंदकुमार (२६) आणि प्रसाद तोंडलेकर (३६) यांना गुरुवारी नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्यांना ३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. यातील मुख्य सूत्रधार निलेश तोंडलेकर याचा मात्र ...

ठाणे : जुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहने देण्याचे आमिष दाखवून ग्राहकांकडून आठ वाहने घेऊन त्यांची ५४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मुरलीधर (६२) तसेच त्यांची मुले नंदकुमार (२६) आणि प्रसाद तोंडलेकर (३६) यांना गुरुवारी नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्यांना ३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. यातील मुख्य सूत्रधार निलेश तोंडलेकर याचा मात्र शोध सुरूच असल्याचे पोलिसांनी सांगितले.ठाण्यातील पाचपाखाडी येथील ‘विद्या मोटर्स’ चे चालक विनीत थोरवे यांचाही जुनी वाहने खरेदीविक्रीचा व्यवसाय आहे. तेही निलेशकडून नवीन वाहने घ्यायचे आणि ग्राहकांना विक्री करायचे. काही दिवसांपूर्वी निलेशने वेगवेगळ्या ग्राहकांकडून आठ वाहनांची खरेदी केली. ही ५४ लाखांची आठ वाहने त्याने थोरवे यांना दिली. त्यांच्याकडून त्याने ५४ लाख रुपयेदेखील घेतले. मात्र, निलेशने ज्यांच्याकडून ही वाहने खरेदी केली, त्यांना त्याने पैसेच दिले नाही. काही जणांकडून त्याने पैसे घेतले, पण वाहनाचा ताबा मात्र दिला नाही. अशी वेगवेगळ्या प्रकारे हेराफेरी करून थोरवे यांच्यासह त्याने अनेकांची फसवणूक केली. त्यानंतर तो पसार झाला. या फसवणुकीमुळे ग्राहकांनी तोंडलेकर यांच्या कुटुंबीयांकडे पैसे आणि गाड्यांसाठी तगादा लावला. तेव्हा, त्याचे वडील मुरलीधर तसेच प्रसाद आणि नंदकुमार या भावांनी आपली नेरळ, कर्जत येथे २१ गुंठे जमीन आहे, ती नावावर करण्याचे आश्वासन थोरवे याला दिले. त्याबदल्यात त्याने या ग्राहकांची वाहने त्यांना परत करावी, असा आग्रह मुरलीधर तोंडलेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी धरला. त्यावर विश्वास ठेवून थोरवे यांनी संबंधित ग्राहकांना त्यांची आठही वाहने परत केली. प्रत्यक्षात तोंडलेकर कुटुंबाने त्यांच्या नावावर जमीन केली नाही आणि ५४ लाख रुपयेदेखील दिले नाही. त्यामुळे थोरवे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात २३ नोव्हेंबरला ५४ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी चौकशीनंतर पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, उपनिरीक्षक किरण बघदाने यांच्या पथकाने मुरलीधर तोंंडलेकर यांच्यासह तिघांना अटक केली. यातील मुख्य सूत्रधार निलेशचा मात्र शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.सवलतीचा मोहजुनी वाहने विकत घेऊन त्या बदल्यात ग्राहकांना नवीन वाहने देण्याचा निलेश तोंडलेकर याचा व्यवसाय आहे. त्याने कर्जत येथे ‘ओमसाई मोटर्स’ या नावाने दुकानही थाटले आहे. जुने वाहन विकणाºयांनी नवीन वाहन त्याच्याकडून खरेदी केले , तर तो त्यावर त्यांना चांगली सवलत देत होता. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्याकडून जुन्याच्या बदल्यात नवीन वाहन खरेदी करत होते.

टॅग्स :crimeगुन्हेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका