गृहिणीची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:46 IST2021-08-17T04:46:52+5:302021-08-17T04:46:52+5:30

मुंब्रा : गृहिणीची फसवणूक करून तिच्या जवळील दागिने घेऊन पसार झालेल्या दोघांविरोधात शीळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

Cheating housewife | गृहिणीची फसवणूक

गृहिणीची फसवणूक

मुंब्रा : गृहिणीची फसवणूक करून तिच्या जवळील दागिने घेऊन पसार झालेल्या दोघांविरोधात शीळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कल्याणाफाटा येथील फुलचंद्र निवास या इमारतीमध्ये राहात असलेल्या अलका सोनावणे या १५ ऑगस्टला सकाळी बाजारहाट करून घरी चालल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या जवळ जाऊन दोघांनी त्यांना दादरला कसे जायचे अशी विचारणा करून बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील चेन, कानातील वेल आणि रोख साडेतीन हजार रुपये असा एकूण ७४ हजार ५०० रुपयांचा ऐवज पिशवीमध्ये काढून ठेवण्यास सांगून हातचलाखी करून ती पिशवी घेऊन पोबारा केला.

Web Title: Cheating housewife