आरोग्य अधिकारी पदावरुन शिंदे यांची पुन्हा उचलबांगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 17:36 IST2021-05-28T17:36:40+5:302021-05-28T17:36:51+5:30

देवगीकर यांच्यावर पुन्हा आरोग्य अधिकारी पदाची जबाबदारी

Charudatt Shinde's transfer from health officer in Thane | आरोग्य अधिकारी पदावरुन शिंदे यांची पुन्हा उचलबांगडी

आरोग्य अधिकारी पदावरुन शिंदे यांची पुन्हा उचलबांगडी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे  : ठाणे  शहरातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ठाणे महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदावर चारुदत्त शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु आता त्यांना तेथून हलवून त्यांच्या खांद्यावर पार्कीग प्लाझा कोवीड सेंटरची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


मागील महिन्याभरापूर्वी लाच लुचप्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत तत्कालीन मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या जागी डॉ. वैजयंती देवगीकर यांच्या खांद्यावर या पदाचा प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला होता. परंतु कोरोनाचा वाढता प्रादरुभाव लक्षात घेऊन त्याठिकाणी सक्षम अधिकारी असावा म्हणून डॉ. चारुदत्त शिंदे यांना पुन्हा ठाणे  महापालिकेत पाठविण्यात येऊन त्यांच्या खांद्यावर मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. परंतु त्यांच्या नावाला बहुसंख्य नगरसेवकांनी विरोध केला होता. यापूर्वी देखील कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळेस त्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु त्यांच्याकडून योग्य कामकाज न झाल्याने त्यांना पुन्हा शासनाकडे पाठविण्यात आले होते. त्यानंतर महिनाभरापूर्वी त्यांना पुन्हा त्याच पदावर आणण्यात आल्याने नाराजी वाढली होती. तसेच त्यांना देखील याठिकाणी काम करण्याची इच्छा नसल्याची माहिती समोर आली होती.


परंतु असे असतांनाही त्यांना येथे ठेवून घेण्यात आले आहे. दरम्यान आता त्यांच्या नावाला वाढता विरोध लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने त्यांच्याकडून हा पदभार काढून घेण्यात आला आहे. त्यांना आता पार्कीग प्लाझा कोवीड सेंटरची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी डॉ. वैजयंती देवगीकर यांना मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदावर कायम ठेवण्यात आले आहे.

Web Title: Charudatt Shinde's transfer from health officer in Thane

टॅग्स :thaneठाणे