शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

कर कमी करण्याऐवजी शास्ती , बिल्डर संघटनेचा विरोध, ‘ओपन लॅण्ड टॅक्स’च्या वसुली व थकबाकीवर दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 06:44 IST

राज्यभरातील महापालिकांच्या हद्दीत ओपन लॅण्डच्या करवसुली व थकबाकीवर शास्ती लागू करण्याचा अध्यादेश राज्य सरकारने २४ नोव्हेंबरला काढला आहे. मात्र, त्यास केडीएमसी हद्दीतील बिल्डर संघटनेने विरोध केला आहे.

- मुरलीधर भवारकल्याण : राज्यभरातील महापालिकांच्या हद्दीत ओपन लॅण्डच्या करवसुली व थकबाकीवर शास्ती लागू करण्याचा अध्यादेश राज्य सरकारने २४ नोव्हेंबरला काढला आहे. मात्र, त्यास केडीएमसी हद्दीतील बिल्डर संघटनेने विरोध केला आहे.राज्यातील अन्य पालिकांपेक्षा केडीएमसी सर्वाधिक म्हणजे १०० टक्के ओपन लॅण्ड टॅक्स वसूल करते. तो कमी करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. मात्र, त्याचा निर्णय प्रलंबित आहे. अनेक थकबाकीची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. असे असताना सरकारने शास्ती लागू करण्याचा निर्णय घेऊन एक प्रकारे बिल्डरांची दिशाभूल व फसवणूक केली जात आहे, असा आरोप बिल्डरांनी केला आहे.राज्य सरकारच्या लोकलेखा समितीने आठव्या अहवालानुसार ओपन लॅण्डवरील करवसुली, त्यावरील दंडात्मक व्याज येणे बाकी आहे. त्यासाठी त्यावर शास्ती लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे उदाहरण द्यायचे झाल्यास एखाद्या बिल्डर ओपन लॅण्ड टॅक्सपोटी एक लाख रुपये देणे बाकी असल्यास त्याला शास्तीपोटी आणखी एक लाख रुपये, असे एकूण दोन लाख रुपये द्यावे लागतील. केडीएमसी सर्वाधिक कर घेत असल्याने तो भरण्यास बिल्डर उत्सुक नाहीत. कर कमी झाल्यानंतर तो भरू, अशी त्यांची मानसिकता आहे. त्यामुळे चालू वसुली आणि थकबाकीची रक्कम वाढत आहे.ओपन लॅण्ड टॅक्स व थकबाकीपोटी महापालिकेस १६० कोटी रुपये येणे बाकी आहे. शास्तीची आकारणी झाल्यास हा आकडा दुप्पट म्हणजे ३२० कोटी होईल. २७ गावांमधील आठ मोठ्या बिल्डरांकडून हा कर व थकबाकीपोटी ५८ कोटी २७ लाख रुपये येणे बाकी आहे. त्यालाही शास्ती लावल्यास त्याचा आकडा ११६ कोटींच्या घरात जाऊ शकतो.सहाशे फुटांच्या बांधकामापर्यंत शास्ती लागू नाही. ती आधी आकारली जात होती. ती ठाणे महापालिका निवडणुकीच्या वेळी रद्द करण्यात आली. ६०० ते एक हजार फुटांच्या बांधकामास ५० टक्के शास्ती आकारली जाते. तर, एक हजार फुटांच्या बांधकामास एक, एक अशी दुप्पट शास्ती आकारली जाते.कन्स्ट्रक्शन व्यवसाय संपवण्याचे कारस्थानकेडीएमसीला सगळ्यात जास्त कर बिल्डर देत आहेत. आजमितीस दर महिन्याला बिल्डरांकडून विकास करापोटी महापालिकेच्या तिजोरीत १२ ते १५ कोटींचे उत्पन्न जमा होते. सगळ्यात जास्त ओपन लॅण्ड महापालिका बिल्डरांना लागू केला आहे. हा कर कमी करण्याची मागणी चार वर्षांपासून महापालिकेपासून राज्य सरकारकडे केली जात आहे. तीन महापौर व चार आयुक्त बदलून गेले, तरी बिल्डरांच्या मागणीचा विचार झालेला नाही.बिल्डरांचा व्यवसाय बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे. स्मार्ट सिटी व कल्याण ग्रोथ सेंटर तयार केले जाणार आहे. २७ गावांतील बेकायदा व आरक्षित भूखंडावरील अतिक्रमण हटवण्याकडे दुर्लक्ष करणारी महापालिका स्मार्ट सिटी कशी उभारू शकते. गोरगरिबांना स्मार्ट सिटीची स्वप्ने दाखवली जात आहेत. दुसरीकडे बिल्डरांची फसवणूक केली जात आहे.त्यात भर म्हणून ओपन लॅण्डवरील शास्तीचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याला एमसीएचआयचा विरोध आहे. त्याच्याविरोधात उपोषण व आंदोलन येत्या जानेवारीत करण्यात येणार असल्याचा इशारा ‘एमसीएचआय’चे अध्यक्ष मनोज राय यांनी दिला आहे.एकच करप्रणाली हवी : पाटीलएमसीएचआय या बिल्डर संघटनेचे सचिव रवी पाटील यांनी सांगितले की, शास्ती आम्ही भरतोच आहोत. त्यामुळे आणखी नव्याने शास्ती लावण्याचे कारण काय. जास्तीचा कर लागू केला आहे. तो आधी सरकारने कमी करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा. केंद्र व राज्य सरकारने जीएसटी लागू करून एक देश, एक कर, हे कसे योग्य व देशाच्या विकासाला फायदेशीर आहे, असे सांगितले.एमसीएचआय या बिल्डर संघटनेचे सचिव रवी पाटील यांनी सांगितले की, शास्ती आम्ही भरतोच आहोत. त्यामुळे आणखी नव्याने शास्ती लावण्याचे कारण काय. जास्तीचा कर लागू केला आहे. तो आधी सरकारने कमी करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा. केंद्र व राज्य सरकारने जीएसटी लागू करून एक देश, एक कर, हे कसे योग्य व देशाच्या विकासाला फायदेशीर आहे, असे सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका