शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चालक उपस्थित झाल्यास दंड आकारणी करा: वाहन ‘उचले’गिरी नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 22:09 IST

नो पार्किंगमधील वाहन उचलल्यानंतर वाहतूक टोर्इंग करणा-या वाहनाच्या मागे धावणारा चालक... त्यानंतर पोलिस आणि चालक यांच्यात झालेला वाद.. या नेहमीच्या प्रकारामध्ये यापुढे आता बदल होणार आहे.

ठळक मुद्दे ठाण्याच्या सह पोलीस आयुक्तांचे आदेशनो पार्र्किंगमधील वाहनांवरील कारवाईमध्ये बदलवाहन चालकांना मिळणार दिलासा

ठाणे: ‘नो पार्र्किंग’मधील दुचाकी अथवा चार चाकी वाहनांवर कारवाई करतांनाच चालक उपस्थित झाल्यास वाहन उचलून नेण्याची कारवाई थांबवून त्याऐवजी दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी ठाणे शहर पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेला दिले आहेत. या नविन आदेशामुळे वाहन चालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.बºयाचदा वाहतूकीचे नियम मोडणाºया, वाहने नो पार्र्किंग झोन मध्ये किंवा रस्त्यात अडथळा निर्माण होईल, अशा त-हेने उभी करुन बाजारात किंवा रुग्णालयात जाणा-या चालकांची वाहने उचलून नेण्याची कारवाई वाहतूक शाखेकडून केली जाते. संबंधित वाहन उचलून नेण्याची कारवाई सुरु असतांनाच जर वाहन चालक उपस्थित झाला तर त्याला त्या त्या कार्यक्षेत्रातील वाहतूक शाखेच्या पोलीस चौकीत उपस्थित राहण्याचे फर्मान पोलीस हवालदाराकडून काढले जाते. त्यातूनच वाहन चालक आणि पोलीस यांच्यात खटके उडतात. बहुतांश वेळा ‘जो काही असेल तो दंड आकारा पण आता गाडी सोडा’, अशी माफक अपेक्षा वाहन चालकांची असते. हीच समस्या लक्षात घेऊन सह पोलीस आयुक्त पांडेय यांनी यामध्ये सुधारणा करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांना दिले आहेत. त्यानुसार यापुढे नो पार्र्किंग मधील वाहन उचलण्याची प्रक्रीया सुरु असतांनाच तिथे जर वाहन मालक किंवा चालक उपस्थित झाला तर नो पार्र्किंगसाठीचा जो काही दंड असेल तो आकारुन गाडी संबंधित चालकाच्या स्वाधीन करण्यात येईल. समजा, त्यातही काही समस्या असेल, पैसे नसतील, तर ई चलनामार्फतही दंड आकारला जाईल. यात गाडी उचलण्याचा आकार समाविष्ट केला जाणार नाही. पण गाडी उचलल्यानंतर गाडीचा मालक तिथे आला तरीही त्याला चौकीत बोलविण्याऐवजी गाडी लगेचच दिली जाईल, त्यासाठी त्याच्याकडून नो पार्र्किंग साठीचा दंड तसेच गाडी टोर्इंग अर्थात ती उचलण्याचे शुल्कही गाडी चालकाकडून आकारले जाईल, अशा महत्वाच्या दोन बदलाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पण, मालक तिथे नसल्यास मात्र गाडी उचलण्याची कारवाई केली जाणार आहे. हे बदल तात्काळ अंमलात आणण्याचे आदेश उपायुक्त काळे यांनी ठाणे शहर आयुक्तालयातील ठाणे, वागळे इस्टेट, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या पाचही परिमंडळातील १८ युनिटसच्या वरीष्ठ निरीक्षकांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPoliceपोलिस