पूर्ववैमनस्यातून तरुणावर चॉपरहल्ला

By Admin | Updated: October 10, 2016 03:18 IST2016-10-10T03:18:59+5:302016-10-10T03:18:59+5:30

पूर्ववैमनस्यातून सनी मनोज दासरे या तरुणावर तिघांनी चॉपरने हल्ला केला. ही घटना कल्याण पूर्वेत शनिवारी घडली. याप्रकरणी कोळसेवाडी

Chaparahalla on the youth from pre-eminence | पूर्ववैमनस्यातून तरुणावर चॉपरहल्ला

पूर्ववैमनस्यातून तरुणावर चॉपरहल्ला

कल्याण : पूर्ववैमनस्यातून सनी मनोज दासरे या तरुणावर तिघांनी चॉपरने हल्ला केला. ही घटना कल्याण पूर्वेत शनिवारी घडली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात बाळा शर्मा, किरण शर्मा, विकी शर्मा या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून यातील किरण आणि विकीला पोलिसांनी अटक केली आहे.
कल्याण पूर्वेकडील आनंदवाडी येथे राहणारे दिलीप कुरसंगे आणि सनी दासरे हे दोघे मिलिंदनगर परिसरात उभे होते. त्या ठिकाणी बाळा, किरण, विकी हे तिघे आले. आधी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून बाळाने दिलीप आणि सनीला शिवीगाळ केली. या वेळी झालेल्या वादात बाळाने त्याच्याजवळील चॉपरने सनीच्या पोटावर वार केले. या हल्ल्यात सनी गंभीर जखमी झाला. पोटावर वार करणारा बाळा हा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Chaparahalla on the youth from pre-eminence