शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

फेरबदलाने पोलीस ग्राउंडसह विकासकांचेही चांगभलं! एमआरटीएस मार्गिकाबदलाचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 04:12 IST

- अजित मांडके ठाणे : ठाणे महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यानुसार साकेत येथील पोलीस ग्राउंडच्या मधल्या भागातून पूर्वी एमआरटीएसची लाइन ...

- अजित मांडकेठाणे : ठाणे महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यानुसार साकेत येथील पोलीस ग्राउंडच्या मधल्या भागातून पूर्वी एमआरटीएसची लाइन जाणार होती. ती आता रद्द झाली असली, तरी एचटीएमसीआर अर्थात हायकॅपॅसिटी मास ट्रान्सपोर्ट रूट कायम असल्यामुळे पोलीस ग्राउंडला नुकसान होणार होते. ते वाचवण्यासाठी एमआरटीएसच्या मार्गात बदल करण्याचा ठाणे महापालिकेने प्रस्ताव २३ जानेवारीला राज्याच्या नगरविकास खात्याने मंजूर केला असून आता पोलीस ग्राउंडच्या बाजूने ही मार्गिका जाणार आहे. यामुळे पोलीस ग्राउंड तर बचावले आहेच, शिवाय या भागात इतर नवीन खासगी विकासकांची आरक्षणेदेखील विकसित करण्यास चालना मिळून नजीकच्या भविष्यात याचा अंतर्गत मेट्रोलाही मोठा फायदा होणार आहे.ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार या योजनेतील ४५ मीटर रुंद विकास योजना व ३० मीटर रुंद एचसीएमटीआरची आखणी ही मौजे माजिवडा येथील सर्व्हे नं. ३८६ पैकी पोलीस ग्राउंडच्या जमिनीतून जात होती.पोलीस विभागाची जमीन बाधित होणार होत असल्यामुळे प्रस्तावित एमआरटीएसच्या आखणीत (क्रिक व्ह्यू स्टेशनच्या स्थानकात) बदल करण्याचा तसेच या बदलामुळे विकास योजनेतील आरक्षणांच्या आकारमानात बदल करण्याचा निर्णय घेऊन त्या स्वरूपाचा फेरबदल करण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने २२ एप्रिल २०१७ रोजी राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. त्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.असा होणार आरक्षणामध्ये बदलआता एमआरटीएस रद्दबातल झाले असले, तरी त्या जागी एचसीएमटीआर कायम असून त्यात अंतर्गत मेट्रोचा समावेश आहे. त्यामुळे आरक्षणबदलाने आता अंतर्गत मेट्रोच्या मार्गातील अडथळे दूर झाले आहेत. नव्या बदलानुसार एमआरटीएसची मार्गिका अर्थात नव्या एचसीएमटीआरनुसार अंतर्गत मेट्रोचा मार्ग आता या पोलीस ग्राउंडमधून नाही, तर बाहेरील बाजूने पुढे सरकणार आहे.त्यामुळे पोलीस ग्राउंडही बचावले आहे. तसेच स्थानकातही बदल केला आहे. त्यानुसार, पूर्वी असलेल्या आरक्षणातही काही प्रमाणात बदल झाले आहेत. त्यानुसार, पोलीस डिपार्टमेंटच्या पूर्वीच्या ३.१० हेक्टर क्षेत्रापैकी आणि फेरबदलामुळे १.३४ हेक्टर क्षेत्र असणार आहे.तर, पोलीस डिपार्टमेंटच्या दुसऱ्या आरक्षणातील १.५० हेक्टरच्या ऐवजी ३.९८ हेक्टर आरक्षित क्षेत्र असणार आहे. तर, नियोजित ४५ मीटर रुंद असलेल्या रस्त्याच्या आखणीतही बदल केला आहे. याशिवाय, ०.२७ हेक्टर पार्किंगचे आरक्षण नव्याने प्रस्तावित केले आहे.याशिवाय, पोलीस डिपार्टमेंटच्या आरक्षणाच्या ठिकाणी १२.० मीटर रुंद रस्ता प्रस्तावित केला आहे.पार्कचे आरक्षणही आता १.१० हेक्टर एवढे असणार आहे. तर, बगिच्याचे आरक्षण ०.६९ हेक्टर असणार आहे. परंतु, या क्षेत्रामधील सीआरझेडने बाधित होणारे प्रस्ताव विकसित करण्यापूर्वी महाराष्टÑ कोस्टल झोन मॅनेजमेंट अ‍ॅथॉरिटीची पूर्वपरवानगी घ्यावी, असेही बंधनकारककेले आहे.

टॅग्स :thaneठाणे