शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

"चंद्रशेखर बावनकुळे वेस्ट इंडीजच्या 'लारा'सारखे नाही, तर 'या' खेळाडूसारखे दिसतात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 16:20 IST

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली होती. फडतूस गृहमंत्री असल्याचं सांगत ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ठाणे प्रकरणातील मारहाणीवरुन लक्ष्य केलं होतं.

ठाणे - शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत जाऊन संसार थाटला आहे. जवळपास ५० आमदारांना सोबत घेत राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले. सत्तासंघर्षाच्या या लढाईत शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि ठाकरे गट विरुद्ध भाजपा असा सामना रंगला आहे. त्यातच, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना घराबाहेर न पडू देण्याचा इशारा दिला होता. त्यावरुन, आता त्यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार पलटवार करत आहेत. उद्धव ठाकरेंवरील टीकेला प्रत्त्युत्तर देताना आमदार देशमुख यांनी बावनकुळे यांना मतिमंद म्हटलं, तर भास्कर जाधव यांनी थेट वेस्ट इंडिजच्या खेळाडूसोबतच त्यांची तुलना केलीय. 

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली होती. फडतूस गृहमंत्री असल्याचं सांगत ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ठाणे प्रकरणातील मारहाणीवरुन लक्ष्य केलं होतं. त्यानंतर, भाजप नेते ठाकरे गटावर आणि उद्धव ठाकरेंवर शाब्दीकरित्त्या तुटून पडले. त्यावेळी, चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट इशाराच दिला होता. उद्धव ठाकरेंनी मर्यादा सोडली तर आम्हीही ऐकणार नाही. तुम्ही आमच्या नेत्यांना बोलणार असाल तर आम्ही सोडणार नाही. आज तुम्हाला शेवटची वॉर्निंग देत आहे. यापुढे फडणवीसांबाबत काही बोललात तर तुम्हाला घराबाहेरही पडू देणार नाही, असा थेट इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता. त्यावर, आता आमदार देशमुख यांच्यानंतर आता भास्कर जाधव यांनीही बोचरी टीका केलीय. ठाण्यातील सभेत बोलताना त्यांनी थेट वेस्ट इंडिजच्या खेळाडूसोबत त्यांची तुलना केलीय.

चंद्रशेखर बावनकुळे हे आहेत महाराष्ट्राचे मात्र दिसतात वेस्ट इंडीजच्या खेळाडूसारखे, असे म्हणत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर बोचरी टीका केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना जाधव यांनी बावनकुळे यांच्या दिसण्यावरुन टीकास्त्र सोडले.  

यावेळी, पुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले, विवियन रिचर्ड मजबूत होता, चंद्रशेखर बावनकुळे पॅट्रिक पॅटरसनसारखा दिसतो का तर नाही, ब्रायन लारसारखो दिसतो का नाही मग तो कोणासारखो दिसतो तर वेस्ट इंडीजचा खेळाडू अ‍ॅम्ब्रोससारखा तो दिसतो, हे लक्षात आले. जुन्या लोकांना माहित आहे अ‍ॅम्ब्रोस कसे होते. नाहीतर बावनकुळे त्यांना रागवायचे, असे म्हणत जाधव यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर बोचरी टीका केली. यावेळी, इतर उपस्थितांनी हसत-हसत भाषणाला दाद दिली. 

तुम्ही वेस्ट इंडीजच्या खेळाडूसारखे दिसतात. मात्र ते खेळाडू होते, ते खेळतही होते. पण, तुम्ही कोणासोबत खेळताय, उद्धव ठाकरेंबरोबर. उद्धव ठाकरे तुम्हाला एका बॉलवर आऊट करतील, पत्ता सुद्धा लागणार नाही. असे म्हणत भास्कर जाधव यांनी बावनकुळेंवर पलटवार केला. 

नितीन देशमुख यांचीही घणाघाती टीका 

''बावनकुळे यांची औकात काय आहे? त्यांनी मातोश्रीच्या बाहेर जाऊन उद्धव ठाकरे यांना रोखून दाखवावे. खरे दूध न पिलेला माणूस म्हणजे बावनकुळे आहे. त्यांच्याकडे पाहिले तर ते एक मतिमंद असलेला माणूस दिसतात. मतिमंद माणसाने अशी भाषा बोलू नये.'', अशा शब्दात आमदार देशमुख यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर घणाघाती टीका केली. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBhaskar Jadhavभास्कर जाधवWest Indiesवेस्ट इंडिजBJPभाजपा