क्लस्टरपुढे त्रुटींचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:38 AM2019-07-20T00:38:38+5:302019-07-20T00:38:41+5:30

क्लस्टर योजनेच्या काही भागांच्या विकासाचा नारळ येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी वाढवण्यात येईल, अशी माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी झालेल्या महासभेत दिली.

Challenge of errors against cluster | क्लस्टरपुढे त्रुटींचे आव्हान

क्लस्टरपुढे त्रुटींचे आव्हान

Next

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत राबवण्यात येत असलेल्या पहिल्या टप्प्यातील क्लस्टर योजनेच्या काही भागांच्या विकासाचा नारळ येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी वाढवण्यात येईल, अशी माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी झालेल्या महासभेत दिली. तसेच बीएसयूपी योजनेतील दोन हजार घरे येत्या महिनाभरात नागरिकांना उपलब्ध करून दिली जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. तर, क्लस्टरच्या आड येणाऱ्या अनेक त्रुटी दूर करण्यात आल्या असल्या, तरी या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत शेवटपर्यंत अनेक त्रुटी उद्भवणार आहेत. त्यामुळे ही योजना राबवण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्यासह देशाचे लक्ष लागलेल्या या योजनेची पायाभरणी विधानसभा निवडणुकीपूर्वी करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. महापालिका हद्दीत ५२ टक्के नागरिक झोपडपट्टी तसेच चाळींमध्ये राहतात. तसेच शहरामध्ये बेकायदा इमारतींची संख्या मोठी असून त्यापैकी अनेक इमारती धोकादायक स्थितीत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये अशा इमारती कोसळून त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी क्लस्टर योजना राबवण्याची मागणी पुढे आली. राज्य शासनाच्या मंजुरीनंतर ती राबवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, त्यानंतर योजनेच्या अंमलबजावणीतअनेक त्रुटी पुढे आल्या.
ग्रामस्थांनी गावठाण भाग वगळण्याची मागणी केली. त्यामुळे या त्रुटी दूर करण्याबरोबरच गावठाण परिसर वगळण्याच्या प्रक्रि येमुळे योजनेस विलंब झाला आहे. या योजनेची अंमलबजावणी प्रत्यक्षात कधी होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच शुक्र वारच्या महासभेमध्ये आयुक्तांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेची पायाभरणी करणार असल्याचे स्पष्ट केले.
.सोमवारी मुख्यमंत्र्यांकडे बैठक
पहिल्या टप्प्यातील क्लस्टर राबवण्याची मोहीम अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच त्यामध्ये उद्भवलेल्या त्रुटी दूर केल्या आहेत. मात्र, प्रथमच अशा प्रकारची योजना राबवली जात असल्याने ती पूर्ण होईपर्यंत त्यामध्ये काही त्रुटी उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही योजना राबवण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही योजना राबवताना तेथील नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात दुसºया ठिकाणी स्थलांतरित करावे लागणार असून त्यासाठी राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. यासाठी येत्या सोमवारी क्लस्टरसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक आयोजिली असल्याचेही त्यांनी सांगितले.
बीएसयूपीच्या दोन
घरांचे लवकरच वाटप
क्लस्टर योजना राबवत असतानाच शहरात मागील कित्येक वर्षांपासून बीएसयूपीच्या घरांची कामे रखडलेली आहेत. ती आता पूर्णत्वास आली असून येत्या महिनाभरात दोन हजार घरांच्या चाव्यांचे वाटप केले जाणार आहे. या योजनेतील लाभार्थी सध्या भाडेतत्त्वावरील घरांमध्ये राहत असून त्यांना ही घरे दिल्यानंतर भाडेतत्त्वावरील घरे रिकामी होणार आहेत. त्याठिकाणी अन्य नागरिकांचे पुनर्वसन करणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Challenge of errors against cluster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.