रिक्षाचा धक्का लागल्याने चाकूहल्ला

By Admin | Updated: December 24, 2016 03:11 IST2016-12-24T03:11:23+5:302016-12-24T03:11:23+5:30

रिक्षाचा धक्का लागला म्हणून चाकूने हल्ला करून दोघांना जखमी केल्याप्रकरणी भार्इंदर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

Chakahala, due to the rickshaw pull | रिक्षाचा धक्का लागल्याने चाकूहल्ला

रिक्षाचा धक्का लागल्याने चाकूहल्ला

मीरा रोड : रिक्षाचा धक्का लागला म्हणून चाकूने हल्ला करून दोघांना जखमी केल्याप्रकरणी भार्इंदर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. तर, यातील मुख्य आरोपी पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
कृष्णानंद दुबे (३५) हा चालक भार्इंदर पश्चिम एसटी स्थानकाजवळून रिक्षा वळवत असताना तेथे उभ्या असलेल्या तरुणांच्या टोळक्यास धक्का लागला. यावरून बाचाबाची होऊन आरोपींनी कृष्णानंदसह इंद्रजित अच्छेभर सिंह (३०) या दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी जवळच असलेल्या भुर्जी पावच्या बाकड्यावरून चाकू व धातूचे भांडे घेऊन कृष्णानंद व इंद्रजितवर हल्ला चढवला. यात कृष्णानंद जबर जखमी झाला. या प्रकरणी भार्इंदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून जयेश सोनावणे (२३) व विक्रांत निजाई (२४) तसेच रवी सेवालाल गुप्ता (२५) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून जयेश, विक्रांत व रवी यांना अटक केली. सरवर पसार झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Chakahala, due to the rickshaw pull

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.