शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

२६ कोटींच्या GST घोटाळा चौकशीत समोर आली १४० कोटींची चोरी; मुंबई-ठाण्याशी कनेक्शन काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 14:28 IST

बनावट जीएसटी देयकांच्या आधारे १४० कोटी रुपयांची करचोरी करणाऱ्याला मुंबईच्या क्षेत्रीय केंद्रीय जीएसटी विभागाने अटक केली आहे.

GST Fraud: ठाणे जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा जीएसटी घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणात अधिकाऱ्यांनी २६.९२ कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळ्याशी संबंधित जीएसटी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या रॅकेटच्या मास्टरमाइंड अटक करण्यात आली आहे. मात्र या कारवाईमधून मोठी माहिती समोर आली आहे. २६.९२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा तपास करताना १४० कोटी रुपयांच्या बनावट जीएसटी इनव्हॉइस रॅकेटचाही पर्दाफाश झाला.

बनावट जीएसटी देयकांच्या आधारे १४० कोटी रुपयांची करचोरी झाल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणात मीरा रोड येथून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. कपाडिया मोहम्मद सुल्तान असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सीजीएसटी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कपाडिया मोहम्मद सुल्तानने जीएसटी न भरता बनावट इनव्हॉइस तयार करण्यासाठी बनावट कंपन्यांचे जाळे तयार केले होते. कपाडियाने  १८ बनावट कंपन्यांच्या नावाने देयके इनव्हॉइस करुन जीएसटीचा परतावा घेतला. या बनावट परताव्यांमधून त्याने १४० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे समोर आलं आहे.

कपाडियाने रॉयल एंटरप्राइज, सरस्वती एंटरप्राइजेस, लुकास इन्फ्राट्रेड एलएलपी आणि मारुती ट्रेडिंग यासारख्या कंपन्या केवळ सरकारची फसवणूक करण्यासाठी स्थापन केल्या होत्या. कपाडियाने या घोटाळ्यासाठी विविध लोकांचे आधार, पॅनकार्ड आणि इतर केवायसी कागदपत्रे वापरली होती. यासाठी त्याने या लोकांना पैसेही दिले होते. त्यानंतर त्याने या ओळखपत्रांचा गैरवापर करून बनावट फर्म्सच्या नावाने बँक खाती उघडली आणि त्यामध्ये जीएसटी परतावा घेतला. कपाडियाला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पुण्यात १,१९६ कोटींचा जीसएटी घोटाळा

जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या पुणे विभागीय शाखेने १,१९६ कोटी रुपयांचा जीएसटी घोटाळा उघडकीस आणला. अधिकाऱ्यांनी पुणे, दिल्ली, नोएडा आणि मुझफ्फरनगरमधील विविध ठिकाणी छापे टाकून केलेल्या तपासात बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) व्यवहारांमध्ये सहभागी बोगस कंपन्यांचे एक रॅकेट समोर आणलं. 

टॅग्स :thaneठाणेGSTजीएसटीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी