शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील ग्राम पंचायतींमधील कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी सीईओ सरसावले!

By सुरेश लोखंडे | Updated: June 23, 2024 19:37 IST

या भेटी दरम्यान सीईओ यांनी संबंधित गावांच्या व जवळच्या महापालिकांच्या डंपिंग ग्राऊंड, घनकचरा प्रकल्प, हायवेलगतच्या कचऱ्याची पहाणी केली.

ठाणे : जिल्ह्यातील शहरांजवळच्या व महामार्गाच्या बाजूला असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा ही समस्या गंभीर झाली आहे. त्यावर वेळीच उपाययाेजना करण्याची गरज हेरून ठाणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी भिवंडी, कल्याण, शहापूर, अंबरनाथ तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी देऊन या कचरा समस्येचे गांभीर्य जाणून घेत त्यावर वेळीच उपाययाेजना करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

             या भेटी दरम्यान सीईओ यांनी संबंधित गावांच्या व जवळच्या महापालिकांच्या डंपिंग ग्राऊंड, घनकचरा प्रकल्प, हायवेलगतच्या कचऱ्याची पहाणी केली. या कचऱ्याच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्याचे विविध प्रकारे विल्हेवाट करण्यासाठी ग्रामस्थांनी देखील पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा घुगे यांनी या भेटी दरम्यान गांवांमधील रहिवाश्यांकडून केली आहे. या दाैर्या प्रसंगी घुगे यांनी भिवंडी तालुक्यातील हायवे लगतच्या दिवे अंजुर, मानकोली, वडपे, पडघा आणि कोण या ग्रामपंचायतींना भेट दिली.             शहापूर तालुक्यातील बोर शेती, वाफे आणि चेरपोली ग्रामपंचायत भेट देऊन तेथील डम्पिंग ग्राउंडची पहाणी केली. शहापूर तालुक्यातील दहिगाव येथील जेएसडब्ल्यू अंतर्गत कार्यरत असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास देखील त्यांनी भेट दिली. यावेळी प्रकल्प संचालक अतुल पारस्कर, भिवंडीचे बीडीओ डॉ. प्रदीप घोरपडे, उप अभियंता रमेश सासे आदी उपस्थित होते.

             कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप ग्रामपंचायतींलाही घुगे यांनी भेटी देऊन येथील नाला सेतू ट्रीटमेंट प्लांटचे काम त्वरित पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. वरप ग्रामपंचायत अंतर्गत तात्काळ कचरा संकलन केंद्र उभारणीसाठी नियोजन करण्यात यावे अशा सूचना गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांना देण्यात आल्या. अंबरनाथ तालुक्यातील ग्रामपंचायत नेवाळी व उसाटणे येथे भेट देण्यात आली. उसाटणे येथील कचरा व्यवस्थापन केंद्राचे कामकाज वेळेत पूर्ण करावे असे आदेश देण्यात आले. ग्रामपंचायत नेवाळी येथे घुगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नेवाळी नाका येते कचरा टाकण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सुचना देण्यात आल्या. 

 

 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नthaneठाणेambernathअंबरनाथ