शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पोलिसांच्या मदतीला केंद्रीय शीघ्र कृती दलाची कुमक

By जितेंद्र कालेकर | Updated: May 26, 2020 00:18 IST

पोलिसांवर बंदोबस्ताचा वाढणारा ताण कमी करण्यासाठी ठाण्यातील वागळे इस्टेट आणि ठाणे शहर या दोन परिमंडळांमध्ये केंद्रीय शीघ्र कृती दलाची एक कंपनी सोमवारपासून तैनात करण्यात आली आहे.जमावबंदीचा आदेश मोडणारे, गर्दी करणारे तसेच जमाव करुन हुल्लडबाजी करणाऱ्यांवर या पथकाकडून कारवाई केली जाणार आहे.

ठळक मुद्देमुंब्रा आणि वागळे इस्टेट भागात घालणार गस्तकोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या भागात ठेवणार विशेष नजर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवर बंदोबस्ताचा वाढणारा ताण कमी करण्यासाठी ठाण्यातील वागळे इस्टेट आणि ठाणे शहर या दोन परिमंडळांमध्ये केंद्रीय शीघ्र कृती दलाची एक कंपनी सोमवारपासून तैनात केली आहे. या कंपनीने हाजूरी आणि मुंब्रा या दोन भागांमध्ये पथसंचलन करुन नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.एकीेकडे मुंब्रा आणि वागळे इस्टेट परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यातच कारवाईसाठी सरसावलेल्या आणि बंदोबस्तासाठी ठिकठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांनाच कोरोनाची बाधा झाली आहे. आतापर्यंत १०४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी एका महिला कॉन्स्टेबलचा मृत्यु झाला. तर ४८ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. उर्वरित ५५ पोलिसांवर वेगवेगळया रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. शहरातील अनेक कंटेनमेंट झोन परिसरातही पोलिसांचे संख्याबळ अधिक खर्ची होत आहे. सध्या ७० पेक्षा अधिक पोलिसांना कॉरंटाईन केले आहे. अपु-या संख्येमध्ये कोरोनाचा बंदोबस्त करणाºया स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दलाचे पोलीस तसेच गृहरक्षक दलाच्या जवानांवरही मोठया प्रमाणात ताण वाढला होता. या सर्वच बाबी विचारात घेऊन मुंबईप्रमाणेच ठाण्यातही शीघ्र कृती दलाच्या एका कंपनीची मागणी ठाणे पोलिसांनी राज्य सरकारकडे केली होती. ही १२० जवानांची पहिली फौज सोमवारी पाठविण्यात आली आहे. ठाणे शहर आणि वागळे इस्टेट या दोन परिमंडळांमध्ये प्रत्येकी ६० जवांनाची सशस्त्र फौज तैनात केली आहे. वागळे इस्टेट विभागातील श्रीनगर आणि वागळे इस्टेट या दोन पोलीस ठाण्यांतर्गत आता हे आरएएफचे जवान गस्त घालणार आहेत. जमावबंदीचा आदेश मोडणारे, गर्दी करणारे तसेच जमाव करुन हुल्लडबाजी करणाºयांवर या पथकाकडून कारवाई केली जाणार आहे. तर ठाण्यातील कळवा विभागातील मुंब्रा भागातही हे पथक करडी नजर ठेवणार आहे. जिथे नियंत्रणाबाहेर जाणारी गर्दी असेल, तिथे या दलाकडून धडक कारवाई केली जाणार आहे. या दलाच्या बंदोबस्तामुळे राज्य राखीव दल आणि स्थानिक पोलिसांनाही काही प्रमाणात विश्रांती घेता येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

‘‘ ज्या भागात कोरोनाचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव आढळला आहे. त्या भागातील कंटेनमेंट झोन परिसरात विशेषत: मुंब्रा, राबोडी आणि वागळे इस्टेट या भागात शीघ्र कृती दलाची कुमक तैनात केली आहे. मोठया गर्दीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनाही काही प्रमाणात त्यामुळे दिलासा मिळणार आहे.’’विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस