मध्य रेल्वेची सेवा १५ तासांनी रुळांवर

By Admin | Updated: July 2, 2017 04:10 IST2017-07-02T04:10:06+5:302017-07-02T04:10:06+5:30

मंगला एक्स्प्रेसचे इंजिन रुळांवरून घसरल्याची घटना शुक्रवारी दुपारी कल्याण स्थानकात घडली होती. त्यामुळे उपनगरी रेल्वेचे वेळापत्रक

Central Railway service in 15 hours | मध्य रेल्वेची सेवा १५ तासांनी रुळांवर

मध्य रेल्वेची सेवा १५ तासांनी रुळांवर

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : मंगला एक्स्प्रेसचे इंजिन रुळांवरून घसरल्याची घटना शुक्रवारी दुपारी कल्याण स्थानकात घडली होती. त्यामुळे उपनगरी रेल्वेचे वेळापत्रक सपशेल कोलमडले होते. ते रुळांवर येण्यासाठी तब्बल १५ तासांचा अवधी लागला.
मंगला एक्स्प्रेसच्या अपघातामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या व उपनगरी लोकलची वाहतूक शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अर्धा ते एक तास विलंबाने धावत होती. ती सुरळीत होण्यासाठी शनिवारची पहाट उजाडली. रेल्वेसेवा पूर्ववत झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Web Title: Central Railway service in 15 hours