शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

केंद्र सरकारने सुप्रिम कोर्टाला इमपीरिकल डेटा सुपूर्द करावा, ठाणे कॉंग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 15:43 IST

Congress News: मागील अनेक दिवसांपासून सर्वत्र ओबीसी आरक्षणावरून रानपेटलेले आहे. त्यात भारत सरकारकडे ओबीसींच्या बाबतीतला एम्पिरिकल डाटा तयार आहे. मात्र, केंद्र सरकार तो डाटा सुप्रीम कोर्टाला देण्यास टाळाटाळ करत आहे.

ठाणे - मागील अनेक दिवसांपासून सर्वत्र ओबीसी आरक्षणावरून रानपेटलेले आहे. त्यात भारत सरकारकडे ओबीसींच्या बाबतीतला एम्पिरिकल डाटा तयार आहे. मात्र, केंद्र सरकार तो डाटा सुप्रीम कोर्टाला देण्यास टाळाटाळ करत आहे. तसेच हा डाटा डाटा  केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला सादर केल्यास स्थानिक स्वराज्य संस्था मधले ओबीसींचे आरक्षण पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनानुसार ठाणे शहर कॉंग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने प्रदेश ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी यांच्या आदेशाने व ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनाने तहसीलदार (महसूल) राजेंद्र चव्हाण यांना ठाणे काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

केंद्र शासनाकडे ओबीसींच्या एम्पिरिकल डाटा तयार असून हा डाटा केंद्र सरकार तो डाटा सुप्रीम कोर्टाला सुपूर्द करण्यास टाळाटाळ करत आहे. तसेच हा डाटा त्वरित कोर्टात सादर केल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत होणार आहे. या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती यांना 9 ऑगस्ट क्रांती दिनी इमपेरीकल डेटा मिळणेबेबेत निवेदन देण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी ठाणे कॉंग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने तहसीलदार (महसूल) राजेंद्र चव्हाण यांच्याकडे मागणीचे निवेदन ठाणे काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी बोलताना राहुल पिंगळे म्हणाले की आरक्षण रद्द करण्याचा कट बीजेपी सरकारने आखला आहे या लोकांना आरक्षण संपवायचे आहे. आमची मागणी मान्य न केल्यास दिल्ली जंतर मंतर येथे ओबीसींचा भव्य मोर्चा ,राज्यभर जेलभरो, जलसमाधी आंदोलन, आमरण उपोषण, इत्यादी आंदोलने देश व राज्यभर ओबीसींच्या न्याय हक्कासाठी टप्प्याटप्प्याने घेण्यात येतील.आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय निवडणुका घेऊन देणार नाही वेळप्रसंगी बलिदान देऊ पण ओबीसींचे आरक्षण टिकवू असा इशारा देखील पिंगळे यांनी दिला. यावेळी सेवादल अध्यक्ष शेखर पाटील, श्रीकांत गाडीलकर, सागर लबडे, पप्पू मोमीन,शाहिदा मोमीन, नरेश कॅरमकोंडा दिलीप भोईर ,सखाराम पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेस