शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
6
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
7
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
8
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
9
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
10
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
11
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
12
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
13
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
14
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
15
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
16
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
17
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
18
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
19
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
20
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

ठाण्यातील वैभव हास्य योग क्लब, लोढा सुंकुलचा पहिला वाढिदवस सोहळा साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 4:16 PM

हास्य योगाचे महत्त्व आणि विविध प्रकार सांगत वैभव हास्य क्लबचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देवैभव हास्य योग क्लबचा पहिला वाढिदवस साजरा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाण्यातील हास्य योग चळवळीचे प्रणेते डॉ. माधव म्हस्के उपस्थितआपले आयुष्य आनंदाने जगण्यासाठी हास्ययोग उपयोगी - डॉ. माधव म्हस्के

ठाणे: आज ठाणे शहरात २५ हास्य योगाचे क्लब कार्यरत आहेत. हे सर्व क्लब जागतिक किर्तीचे हास्यगुरू डॉ. मदन व माधुरी कटारिया यांच्या प्रेरणेने निर्माण झाले आहेत. रविवार २४ डिसेंबर रोजी अशाच एका क्लबचा तो म्हणजे वैभव हास्य योग क्लबचा पहिला वाढिदवस मोठ्या जोमाने साजरा करण्यात आला. यावेळी ठाण्यातील १० हास्य क्लबच्या प्रमुखांची तसेच, सदस्यांची शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती होती.                 वैभव हास्य क्लबच्या अध्यक्षा पुष्पा उपाध्या यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच गेल्या वर्षाचा आढावा घेतला. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी ठाण्यातील हास्य योग चळवळीचे प्रणेते डॉ. माधव म्हस्के उपस्थित होते. यावेळी त्यांनी हास्ययोगाचे विविध प्रकार सांगत, हास्याचे शारिरीक आणि मानसीक फायदे उपस्थितांना सांगितले. आपले आयुष्य आनंदाने जगण्यासाठी हास्ययोग कसा उपयोगी ठरतो हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. ते म्हणाले की, आज जगभर १०५ देशांत हास्य योगाचा प्रसार झाला आहे. हास्यामुळे रक्ताभिसरण चांगले राहते. फुप्फुसांची क्षमता वाढते. आपचनाचा त्रास नाहीसा होतो. निद्रानाशवर हेएक उत्तम औषध आहे. उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. हृदय सुदृढ राहते. नकारात्मकता जावून सकारात्मकता येते. हास्यायोगातील प्राणयामामुळे आॅक्सिजनची मात्रा संपूर्ण शरीरात व मेंदूमध्ये वाढते. त्यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटते. हास्य योग हे केवळ ज्येष्ठांसाठी नव्हे तर सर्वच वयोगटासाठी फायदेशीर आहे. हास्य योगाच्या सरावामुळे दु:खाना सामोरे जाण्याची शक्ती वाढते अशी माहितीही त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर वक्तव्यात दिली. याप्रसंगी सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त अशोक जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, मनु शाह यांच्या क्रि केट थीम हास्याने सर्वांना खुश केले. साहित्यिका विमल खरात यांनी एक कविता सादर करून श्रोत्यांचे लक्ष वेधले. संपूर्ण कार्यक्र माचे सूत्रसंचालन जितेंद्र धर्मसी व छाया सिंग यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन होऊन कार्यक्र माची सांगता झाली.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकHealthआरोग्य