शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

सीडीआर प्रकरण : कंगणा रानौत, आयेशा श्रॉफचीही चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 01:34 IST

बेकायदेशीर सीडीआर प्रकरणामध्ये अभिनेत्री कंगणा रानौत आणि जॅकी श्रॉफ यांच्या पत्नी आयेशा श्रॉफ यांची नावे मंगळवारी समोर आली. त्यांची यासंदर्भात लवकरच चौकशी केली जाणार आहे.

- राजू ओढेठाणे : बेकायदेशीर सीडीआर प्रकरणामध्ये अभिनेत्री कंगणा रानौत आणि जॅकी श्रॉफ यांच्या पत्नी आयेशा श्रॉफ यांची नावे मंगळवारी समोर आली. त्यांची यासंदर्भात लवकरच चौकशी केली जाणार आहे.सीडीआर प्रकरणात गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक १ ने शुक्रवारी रात्री अ‍ॅड. रिझवान सिद्दीकी यांना अटक केली. त्यांच्या लॅपटॉप आणि मोबाईल फोन्सची पडताळणी सुरू आहे. यात पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. कंगणा आणि हृतिक रोशन यांचा वाद सर्वश्रुत आहे. कंगणाने सिद्दीकींना मोबाईलवर केलेले मेसेज पोलिसांना मिळाले आहेत. एका मेसेजमध्ये कंगणाने हृतिकचा मोबाईल नंबर सिद्दीकीना पाठवला आहे. हृतिकचा सीडीआर मिळवण्यासाठी कंगणाने त्याचा मोबाईल पाठवला होता का, याची चौकशी पोलीस करणार आहेत. त्यासाठी कंगणाला नोटीस बजावणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.दुसरे प्रकरण जॅकी श्रॉफ यांच्या पत्नी आणि टायगर श्रॉफची आई आयेशा श्रॉफ यांचे आहे. आयेशा आणि अभिनेता साहील खान यांच्यातील संबंध न्यायप्रविष्टही झाले. आयेशानी साहिलच्या मोबाईल सीडीआर कुठून तरी मिळवला. तो तिने सिद्दीकींना पुरवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे आयेशा यांनाही समन्स बजावणार आहे.आणखी एका अभिनेत्रीची तक्रारबेकायदेशीर सीडीआर प्रकरणामध्ये बॉलिवूडच्या आणखी एका अभिनेत्रीने मंगळवारी ठाणे पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी तिला सविस्तर जबाब नोंदविण्यास सांगितले आहे. तीन वर्षांपूर्वी या अभिनेत्रीने महाराष्ट्राचे तत्कालीन पोलीस महासंचालक सुनील पारसकर यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार केली होती. या प्रकरणात अ‍ॅड. रिझवान सिद्दीकी हे सक्रिय होते, असा आरोप या अभिनेत्रीने केला. आपल्या मोबाईल फोनचा सीडीआरही अ‍ॅड. सिद्दीकी यांनी काढल्याचा संशय तिने व्यक्त केला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाKangana Ranautकंगना राणौत