शाळेला दिले सीसीटीव्ही
By Admin | Updated: March 2, 2016 01:35 IST2016-03-02T01:35:30+5:302016-03-02T01:35:30+5:30
१९९४ ते १९९६ या कालावधीत पां. जा. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात इ. १० वी ते १२ वी मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी स्रेहसंमेलन व शिक्षक गौरव समारंभाचे आयोजन केले होते

शाळेला दिले सीसीटीव्ही
वाडा : १९९४ ते १९९६ या कालावधीत पां. जा. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात इ. १० वी ते १२ वी मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी स्रेहसंमेलन व शिक्षक गौरव समारंभाचे आयोजन केले होते. माजी विद्यार्थ्यांनी यावेळी शाळेला सीसीटीव्ही यंत्रणा भेट दिली. सोहळ्याला आजी-माजी मुुख्याध्यापकांसह ३० ते ३५ शिक्षक उपस्थित होते तर विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक परशुराम सावंत, जी. बी. काळे, कोल्हे, सेवा निवृत्त उपप्राचार्य वसंत
सोनावणे, माजी मुख्याध्यापक
प्रभाकर गोतारणे, विद्यमान मुख्याध्यापक भंगाळे, सरस्वती विद्यालय कंचाडचे मुख्याध्यापक व्ही. पी. पाटील, ठाण्याचे जि. प. उपशिक्षणाधिकारी एस. एस.
पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचा माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कारकेला. सीसीटीव्हीसाठी २५ हजाराचा धनादेश
विद्यार्थ्यांनीही आपल्या मनोगतातून विविध क्षेत्रात मिळवलेल्या पदव्या आणि यशाचे श्रेय या शाळेला व उपस्थित शिक्षकांना देऊन त्यांच्याप्रती आदर भाव व्यक्त केला. तसेच या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेसाठी भेट म्हणून शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी या सोहळ्यातच ठेकेदारास रू. २५ हजाराचा चेक देण्यात आला.माजी विद्यार्थ्यांचे संयोजन
हा समारंभ घडवून आणण्यासाठी माजी विद्यार्थी सचिन पष्टे, कपिल चुंभळे, नंदकुमार ठाकरे, प्रविण पवार, सुरेश पष्टे, युवराज ठाकरे, उज्ज्वला मोरे, अस्मिता ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार ठाकरे यांनी केले. सूत्रसंचालन युवराज ठाकरे, स्वाती गायकवाड तर आभार प्रविण पवार यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप स्रेह भोजनाने करण्यात आला.