कसारा घाटात भीषण आपघात; 3 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 06:18 PM2020-08-28T18:18:53+5:302020-08-28T18:19:56+5:30

दोन तासानंतर सुखरूप बाहेर काढलेल्या चालकाचा एका हाताला गंभीर दुखापत झाली असून कपाळाला मार लागला आहे. 

Catastrophic accident in Kasara Ghat; 3 injured | कसारा घाटात भीषण आपघात; 3 जण जखमी

कसारा घाटात भीषण आपघात; 3 जण जखमी

googlenewsNext

- शाम धुमाळ

 नाशिक: नाशिक मुंबई लेन वर कसारा घाटात कांदे घेऊन जाणाऱ्या  ट्रकला आपघात झाला. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून 2 जण किरकोळ जखमी झाले आहे. 

नाशिक लासलगाव हुन मुंबई कडे कांदा घेऊन जाणारा ट्रक चालक  घाट उतरत असताना अचानक ट्रक चें ब्रेक निकामी झाले गाडी चालकाने  गाडीचा वेग नियंत्रनातं आणण्यासाठी प्रयन्त केले परंतु चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी रस्त्या लगतच्या दरडी वर जाऊन धडकली या अपघातात 3 जण गाडीतील कॅबिन मध्ये अडकून पडले त्या पैकी दोघांना 20 मिनिटात काढण्यात यश आले तर गाडीच्या चेसि मद्ये अडकून पडलेल्या गाडी चालकास बाहेर काढण्यास आपत्ती व्यवस्थापन टीम, महामार्ग पोलीस, पीक इन्फ्रा टीम ला तब्ब्ल दोन तास शर्थीचे प्रयन्त करावे लागले. 

दोन तासानंतर सुखरूप बाहेर काढलेल्या चालकाचा एका हाताला गंभीर दुखापत झाली असून कपाळाला मार लागला आहे. त्याला इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात प्रथोमोपचार करून त्याला शिवशक्ती रुग्णालयात  उपचारासाठी दाखल करण्यात करण्यात आले. मनोज रामधन बिंद- वय  25, बिरजूकुमार बिंद- वय 24, रवींद्र गांगुर्ड- वय 32 असे जखमीची नावे आहेत. 

अडकलेल्या चालकास सुखरूप बाहेर काढण्यास शर्थीचे प्रयत्न-

ट्रक च्या केबिन चा चुराडा डोक्यावर  कांदे त्यात ट्रक मद्ये मोठी अडगळ असल्याने पायाचा भाग  अडकून अडकलेल्या ट्रक चालकास सुखरूप बाहेर काढण्या साठी  आपत्ती व्यवस्थापन टीम,महामार्ग पोलीस, पीक इन्फ्रा टीम ची धरपड सुरु होती शरीराचा आर्धा भाग सुखरूप बाहेर  काढला तर आर्धा भाग अडकलेला अनेक प्रयत्न करून यश येत नव्हते. अखेर क्रेन मागवण्यात आले व क्रेन च्या साह्याने ट्रक ची केबिन थोडया प्रमाणात वर उचलन्यात आली त्या नंतर टीम सदस्यांनी पारई  च्या साह्याने अडथळे दूर करून गँभीर जखमी ला सुखरूप बाहेर काढण्यात आले. 

Web Title: Catastrophic accident in Kasara Ghat; 3 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.