शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

धसईमधील कॅशलेस यंत्रणा गुंडाळली , दुकानदारांकडे स्वाइप मशीन धूळ खात पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 00:21 IST

नोव्हेंबर २०१६ मध्ये देशात नोटाबंदी जाहीर होताच सर्वत्र व्यवहार ठप्प झाले. हातात पैसाच येत नसल्याने अशा कठीण परिस्थितीवर मात करण्याचा प्रयोग मुरबाडमधील धसई गावात करण्यात आला.

- पंकज पाटील, मुरबाडनोव्हेंबर २०१६ मध्ये देशात नोटाबंदी जाहीर होताच सर्वत्र व्यवहार ठप्प झाले. हातात पैसाच येत नसल्याने अशा कठीण परिस्थितीवर मात करण्याचा प्रयोग मुरबाडमधील धसई गावात करण्यात आला. शहरापासून लांब असतानाही या गावात कॅशलेस यंत्रणा सुरू करण्याचे धाडस करण्यात आले. या गावातील सर्व व्यापाऱ्यांनी त्या अनुषंगाने प्रयत्नही केले. मुख्य बाजारपेठेतील ७४ हून अधिक व्यापाऱ्यांनी स्वाइप मशीन विकत घेतल्या. मात्र, धसई आणि परिसरातील गावांमध्ये डेबिटकार्ड वापरणाºयांची संख्या कमी आहे. त्यामुळे व्यापारी सकारात्मक असले तरी नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. कॅशलेस मोहिमेकडे विशिष्ट काळातच लक्ष देण्यात आले. आता दुकानदारांच्या स्वाइप मशीन धूळखात आहेत. अनेकांनी मशीन बँकेला परत केल्या आहेत. आज या भागात आठ ते दहा दुकानांतच मशीन असून उर्वरित दुकानदार हे रोखीने व्यवहार करत आहेत. त्यामुळे धसईची कॅसलेस गावाची संकल्पना आणि ओळख संपुष्टात आल्याचे चित्र दिसत आहे.ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटाच्या पायथ्याशी वसलेले धसई हे निसर्गरम्य गाव. धसई या गावाची खरी ओळख म्हणजे माजी महसूलमंत्री शांताराम घोलप यांची कर्मभूमी. डोंगराच्या पायथ्याशी हे गाव वसल्याने या ठिकाणी निम्मी लोकवस्ती ही आदिवासीबांधवांची आहे.धसई परिसरात ३५ ते ४० लहानमोठे आदिवासीपाडे आणि गावे आहेत. या सर्व गावांची मुख्य बाजारपेठ ही धसई गावातच भरते. धसई गावातील बाजारपेठेवरच सर्व गावांचा व्यवहार अवलंबून असल्याने या ठिकाणी अनेक व्यापारी स्थिरावले आहेत. दैनंदिन जीवनात ज्या काही वस्तूंची गरज भासते, त्या सर्व वस्तूंची बाजारपेठ या ठिकाणी उभी करण्यात आली आहे.मात्र, केंद्र सरकारने २०१६ मध्ये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी घालताच देशातील सर्व बाजारपेठांप्रमाणे या धसई गावातील बाजारपेठही ठप्प झाली होती. व्यवहारासाठी लागणारे चलन उपलब्ध होत नसल्याने या ठिकाणी व्यापाºयांना आपला व्यवसाय तोट्यात चालवावा लागत होता. तर, काही व्यापाºयांनी उधारीवर सामान देऊन व्यवसायाचा गाडा पुढे ढकलत नेला होता.गावात मोजक्या दोन बँका असल्याने त्या ठिकाणी पैसे काढण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होत होती. रोख हातात कमी प्रमाणात येत असल्याने या बाजारपेठेला उतरती कळा लागली होती. धसई गावातील या परिस्थितीवर मात करायची कशी, यावर चर्चा सुरू असताना येथील ग्रामस्थांनी एक अनोखा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला.गावातील सर्व व्यापार तोट्यात असल्याने त्यातून सावरण्यासाठी रोखमुक्त गाव करता येईल का, यावर चर्चा सुरू झाली. ही चर्चा प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी खरी साथ दिली, ती स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी. मुरबाडच्या महाराष्ट्र मिलिटरी स्कूलमध्ये संचालक म्हणून सावकरक काम करत आहेत.सावरकर यांनी ‘रोखमुक्त गाव’ निर्माण करण्याचा संकल्प पुढे केला. त्यासाठी धसईची निवड केली. धसई हे गाव आदिवासी भागात मोडत असल्याने या ठिकाणी ही संकल्पना यशस्वी केल्यास देशात कुठेही ही संकल्पना राबवता येणे शक्य आहे, हाच हेतू ठेवण्यात आला. या मोहिमेसाठी प्रत्येकाने प्रयत्न केले.कॅशलेससाठी प्रत्येक दुकानदारांना कार्ड स्वाइप मशीनची गरज होती. या मोहिमेसाठी बँक आॅफ बडोदा यांनी व्यापाºयांकडून दोन हजार रुपये अनामत रक्कम घेऊन ७४ दुकानदारांना स्वाईप मशीन देण्यात आल्या. दुकानदारांनी हे यंत्रही घेतले. मात्र, तीन ते चार महिन्यांनंतर या यंत्राचा वापर कमी झाला.बँकेने स्वाइप मशीनसाठी वर्षभर कोणतीही फी आकारली नाही. तोपर्यंत दुकानदारांनी हे यंत्र आपल्या दुकानात ठेवले. मात्र, दुकानातील मशीनवर कार्ड स्वाईप करणारे ग्राहकच येत नसल्याने हे यंत्र धूळखात होते. वर्ष उलटल्यानंतर या यंत्रावर महिन्याला ५०० ते ७०० रुपये शुल्क आकारण्यास बँकेने सुरुवात केली.ग्राहक येतच नसतील तर यंत्रासाठी महिन्याला एवढी रक्कम भरावीच का, हा प्रश्न व्यापाºयांना पडला. राहिलेल्या यंत्रासाठी महिन्याला पैसे भरावे लागत असल्याने ६० हून अधिक दुकानदारांनी ही यंत्रे बँकेला परत केले. त्यामुळे आजच्याघडीला धसईमध्ये ८ केवळ ते १० यंत्र उपलब्ध आहेत.अनेकवेळा नेटवर्क नसल्याने कार्डद्वारे व्यवहार करणे अवघड जाते. मोजकेच ग्राहक डेबिटकार्डचा वापर करत असल्याने या भागात अपेक्षित असलेली कॅशलेसची मोहीम मंदावली. आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, कॅशलेस यंत्रणा आहे असे म्हणणेही चुकीचे ठरेल.नोटबंदीनंतर धसईला रोखमुक्त गावाचे बिरूद काही दिवसच मिरवता आले. नवलाईचे नऊ दिवस संपले आणि हळुहळु येथील व्यवहार पूर्वीप्रमाणेच रोखीने व्हायला सुरूवात झाली.

टॅग्स :thaneठाणे