ठाण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या मोटारीतून रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:41 IST2021-07-28T04:41:59+5:302021-07-28T04:41:59+5:30

ठाणे : कासारवडवली वाहतूक नियंत्रण शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक अनुजा घाडगे यांच्या मोटारीमधून २० हजारांची रोकड आणि एक ...

Cash lampas from the car of a female police officer in Thane | ठाण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या मोटारीतून रोकड लंपास

ठाण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या मोटारीतून रोकड लंपास

ठाणे : कासारवडवली वाहतूक नियंत्रण शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक अनुजा घाडगे यांच्या मोटारीमधून २० हजारांची रोकड आणि एक मोबाइल तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे चोरट्याने लंपास केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. कासारवडवली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

ठाण्याच्या घोडबंदर रोड, मनोरमानगर भागात राहणाऱ्या अनुजा यांचे पती दतात्रय घाडगे (४०) यांनी त्यांची मोटार घोडबंदर रोड ते ठाण्याकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर वाइनडाइन हॉटेलशेजारी उभी केली होती. मोटारीच्या डाव्या बाजूकडील काच फोडून चोरट्याने २० हजारांची रोकड आणि मोबाइल तसेच इतर कागदपत्रे लंपास केल्याचा प्रकार २६ जुलै रोजी सायंकाळी ७.१५ ते ८.१५ वाजण्याच्या दरम्यान घडला. अनुजा यांचे पती दत्तात्रय घाडगे यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार दाखल केली.

.............

वाचली

Web Title: Cash lampas from the car of a female police officer in Thane