शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

वैभव गायकवाडला धक्काबुक्की करणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 11:42 IST

हिललाइन पोलिस ठाण्याबाहेरील नवा व्हिडीओ व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात केलेल्या गोळीबार प्रकरणातील आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गायकवाड यांच्या मुलास धक्काबुक्की होत असतानाचा हा व्हिडीओ आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या केबिनबाहेर धिंगाणा घालणाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मी केलेल्या गोळीबाराचा सीसीटीव्ही फुटेजमधील व्हिडीओ व्हायरल झाला. मात्र, माझ्या मुलाला झालेल्या धक्काबुक्कीचा व्हिडीओ का समोर आणला जात नाही, असा प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केला होता. यानंतर वैभव गायकवाड यांना धक्काबुक्की करतानाचा व्हिडीओ काही वेळातच व्हायरल झाला. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता जमीनमालक मधुमती जाधव यांच्या तक्रारीवरून गणपत गायकवाड यांच्यासह सात जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा जाब विचारण्यासाठी वैभव समर्थकांसह पोलिस ठाण्यात आले. त्यापाठोपाठ महेश गायकवाड, राहुल पाटील, जमीन मालक चैनू जाधव पोलिस ठाण्यात आले. वपोनि अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये वैभव व महेश यांच्यात चर्चा सुरू असताना आ. गायकवाड तेथे पोहोचले.

रिव्हॉल्व्हर पकडल्याने अनर्थ टळलाकेबिनमधून गोळीबाराचा आवाज येत असल्याचे कळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप केबिनमध्ये गेले. आमदार गायकवाड यांची रिव्हॉल्व्हर काढून घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

 वडील जगताप यांच्या केबिनमध्ये आल्यावर वैभव केबिनमधून बाहेर पडले. त्या दरम्यान पोलिस ठाण्याच्या प्रांगणात दोन्ही समर्थकांत शिवीगाळ, धक्काबुकी व रिव्हॉल्व्हर दाखविण्यात आले. समर्थकांत आरडाओरडा सुरू झाल्यावर, जगताप तो शांत करण्यासाठी केबिन बाहेर पडले. सीसीटीव्हीत सर्व दिसत होते. वैभव यांना मारहाण होत असल्याचे आमदार गायकवाड यांना सीसीटीव्हीत दिसले. त्यांनी रागाच्या भरात महेश व राहुल यांच्यावर गोळीबार केल्याचे आमदार गायकवाड यांचे समर्थक सांगत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे