शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जामंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 07:30 IST

आर्थिक लुबाडणुकीचा कट रचणारे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह महावितरण कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांविरोधात फसवणूक आणि मानसिक आघात पोहोचवण्याचा फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

कर्जत : राज्यातील जनतेला आश्वासन देऊनदेखील सर्वसामान्य जनतेची वीज खंडित करण्याच्या धमक्या देऊन बेहिशोबी वीज बिलांची रक्कम वसूल करणे, ही केवळ राजकीय आश्वासनाची फसवणूक नाही. यामुळे राज्यातील गोरगरीब जनता भयभीत झाली असून, प्रचंड मानसिक आघात आणि क्लेश पोहोचला आहे. आर्थिक लुबाडणुकीचा कट रचणारे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह महावितरण कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांविरोधात फसवणूक आणि मानसिक आघात पोहोचवण्याचा फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, कर्जत शहराध्यक्षा समीर चव्हाण, सचिव चिन्मय बडेकर आणि नगरसेवक धनंजय दुर्गे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महावितरण कंपनीला दिलेल्या निवेदनात कोरोनाच्या महामारीमुळे देशभरात आणि विशेषत: महाराष्ट्रात २२ मार्च २०२० ते ८ जून २०२० दरम्यान अतिकठोर टाळेबंदी होती. या काळात महावितरणकडून ना वीज मीटर रीडिंगसाठी प्रतिनिधी पाठविण्यात आले ना वीज देयके वितरित करण्यात आली. घरातच बंदिस्त झालेल्या जनतेला या कालावधीतल्या वीज वापरासाठी महावितरण कंपनीकडून अचानक वापरापेक्षा तिप्पट-चौपट रकमेची अवाजवी व भरमसाठ वीजबिले पाठविली गेली. राज्यात इतरही राजकीय पक्षांनी नागरिकांमधील संतापाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे वीज बिलांबाबतच्या तक्रारी मांडल्या आहेत. 

ऊर्जामंत्र्यांनी अचानक घूमजाव केल्याने नाराजीप्रत्येक बैठकीनंतर वीजबिलात कपात करण्याबाबतचा निर्णय लवकरच घेऊ आणि नागरिकांना दिलासा देऊ, असे आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी दिले होते. ऊर्जामंत्री आपल्या शब्दाला जागतील आणि त्यांच्यामुळे वीज बिलांत कपात होऊन कोरोना संकटकाळात थोडासा आर्थिक दिलासा मिळेल या आशेवर राज्यातील नागरिक असताना ऊर्जामंत्र्यांनी अचानक घूमजाव केले आहे. प्रत्येक वीजग्राहकाला वीज बिल भरावेच लागेल, असे फर्मान काढले. वीज बिल सरकारी आश्वासन आणि ग्राहकांचा विश्वासघात केला असल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, शहराध्यक्ष समीर चव्हाण, सचिव चिन्मय बडेकर, नगरसेवक धनंजय दुर्गे यांनी पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केला आहे.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतMNSमनसे