बनावट वाहन विमा पॉलिसी प्रकरणी गुन्हा दाखल; एकाला अटक
By धीरज परब | Updated: November 21, 2022 22:11 IST2022-11-21T22:11:34+5:302022-11-21T22:11:41+5:30
ऑक्टोबर पासून पॉलिसी पाहिजे असताना ती सप्टेंबर पासून असल्याने अदनान याने रमेशला तसे सांगितले

बनावट वाहन विमा पॉलिसी प्रकरणी गुन्हा दाखल; एकाला अटक
मीरारोड - मोटार कारची बनावट विमा पॉलिसी काढून देणाऱ्या एका हॅल्मेट विक्रेत्या विरुद्ध मीरारोडच्या नया नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नयानगर भागात राहणाऱ्या अदनान खान ह्या इस्टेट एजंट कडे सेकंडहँड कार आहे . कारच्या विम्याची मुदत संपल्याने त्याचा मित्र रमेश वाघमारे याने ऑनलाईन विमा पॉलिसी काढून देणारा त्याचा परिचित विजयकुमार उर्फ विनय फुलचंद उपाध्याय रा . पेणकरपाडा , मीरारोड असल्याचे अदनान याला सांगितले.
अदनान याचे उपाध्यायशी बोलणे करून दिले. त्यानुसार अदनान याने रमेश कड़े अडीज हजार रुपये दिले. रमेशने विमा पॉलिसी ची कॉपी अदनान यांना व्हॉट्सएप वर पाठवली. ऑक्टोबर पासून पॉलिसी पाहिजे असताना ती सप्टेंबर पासून असल्याने अदनान याने रमेशला तसे सांगितले. रमेशच्या सांगण्यावरून उपाध्याय याने पाठवलेली कॉपी रमेशने अदनान याला पाठवली . परंतु अदनान ह्याला दोन्ही पॉलिसी क्रमांक सारखे असल्याचे दिसून आल्याने ठाणे येथील विमा कार्यालयात चौकशी केली असता त्या दोन्ही विमा पॉलिसी बनावट असल्याचे समजले . १८ नोव्हेम्बर रोजी अदनान याच्या फिर्यादी वरून नया नगर पोलिसांनी उपाध्याय याच्यावर गुन्हा दाखल केला आहे .