शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

मराठी माणसांना 'नो- एन्ट्री' म्हणणाऱ्या घर मालकासह दोघांवर गुन्हा दाखल; मीरारोडमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 21:18 IST

मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांना फेसबुकवर रिंकू संगोई देढिया यांनी त्यांचा मीरारोडच्या शांती नगरमधील फ्लॅट विकायचा आहे म्हणून टाकलेली पोस्ट वाचनात आली होती.

मीरारोड   - मराठी माणसांना घर न विकण्याचा सोसायटीचा नियम असे सांगत मराठी माणसाला घर विक्री करण्यास नकार देणाऱ्या दोघांवर मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांना फेसबुकवर रिंकू संगोई देढिया यांनी त्यांचा मीरारोडच्या शांती नगरमधील फ्लॅट विकायचा आहे म्हणून टाकलेली पोस्ट वाचनात आली होती. देढिया यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये फ्लॅट फक्त गुजराती, मारवाडी आणि जैन समाजाच्या लोकांना विकणार असल्याचे लिहिले होते.

देशमुख यांनी फेसबुकवर दिलेल्या त्या पोस्ट मधील भ्रमणध्वनी वर संपर्क साधला असता त्याने स्वतःचे नाव राहुल देढिया असल्याचे सांगितले. देशमुख यांनी मला तुमचा फ्लॅट विकत घ्यायचा आहे असे सांगितले असता देढिया याने आमच्या सोसायटीत मराठी, ख्रिश्चन, मुस्लिम आदीं लोकांना फ्लॅट विकत नाहीत. तसा सोसायटीचा नियम आहे. सोसायटीत फक्त मारवाडी, गुजराती व जैन लोकांनाच फ्लॅट विकला जातो. तुम्हाला वा मराठी माणसाला विकता येणार नाही असे राहुल याने सांगितले. 

या प्रकरणी देशमुख सह मराठी एकीकरण समितीचे प्रदीप सामंत यांनी पोलिसात तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.  अखेर रविवारी १० ऑक्टोबर रोजी नयानगर पोलिसांनी देशमुख यांच्या फिर्यादी नुसार रिंकू संगोई देढिया आणि राहुल देढिया या दोघांवर भारतीय दंड संहिता १५३ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.  या प्रकरणी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरmarathiमराठी