उल्हासनगरात गुटखा प्रकरणी दोघांवर गुन्हा
By सदानंद नाईक | Updated: September 20, 2022 17:07 IST2022-09-20T17:07:32+5:302022-09-20T17:07:50+5:30
उल्हासनगरातील पान टपरी व दुकानात तंबाखूजन्य विमल गुटखा प्रकरणी गेल्या आठवड्यात ३ गुन्हे दाखल झाले आहेत.

उल्हासनगरात गुटखा प्रकरणी दोघांवर गुन्हा
उल्हासनगर : कॅम्प नं-२ गजानन मार्केट मध्ये बंदी असलेला तंबाखूजन्य गुटखा जवळ बाळगल्या प्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाने सोमवारी दुपारी एक वाजता दोघांना अटक केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगरातील पान टपरी व दुकानात तंबाखूजन्य विमल गुटखा प्रकरणी गेल्या आठवड्यात ३ गुन्हे दाखल झाले आहेत. सोमवारी गजानन मार्केट मधील सार्वजनिक शौचालय येथे दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान ठाणे खंडणी विरोधी पथकाने अरबाज मन्सूर खान व अरमान उस्मान खान यांना तंबाखूजन्य व जीवितास घातक असलेला गुटखा स्वतःकडे बाळगल्या प्रकरणी अटक केली.
ठाणे खंडणी विरोधी पथकाचे महादेव बाबर यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत असून गेल्या आठवड्यात पोलिसांनी पान टपरी व दुकानात गुटखा विक्री प्रकरणी विविध पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल केले आहे.