बेदरकार रेडिओलॉजिस्टच्या मोटारीने ठाण्यात दोघांना उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 09:36 PM2020-12-25T21:36:26+5:302020-12-25T21:40:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : अलिकडेच रशिया येथून आलेल्या वाघबीळ येथील हनी प्रदीप पाटील (२६) या ‘क्ष’ किरण तज्ज्ञाने ...

A careless radiologist's car blew them up in Thane | बेदरकार रेडिओलॉजिस्टच्या मोटारीने ठाण्यात दोघांना उडविले

वाहतूक शाखेच्या पोलिसांनीही केला पाठलाग

Next
ठळक मुद्दे ठाणेनगर पोलिसांनी घेतले ताब्यात वाहतूक शाखेच्या पोलिसांनीही केला पाठलाग




लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: अलिकडेच रशिया येथून आलेल्या वाघबीळ येथील हनी प्रदीप पाटील (२६) या ‘क्ष’ किरण तज्ज्ञाने (रेडिओलॉजिस्ट) कापूरबावडी ते कोपरी त्यानंतर सिडको बस थांबा या मार्गावर बेदरकारपणे भावाची मोटारकार चालवून दोघांना जखमी केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी ठाणेनगर पोलिसांनी त्याला नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेतले.
हनी हा भरघाव वेगाने एका आॅडी मोटारकारने येत असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कापूरबावडी उपविभागाच्या पथकाला शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मिळाली. माजीवडा येथे नाकाबंदी दरम्यान त्याची कार अडविण्यासाठी ठाणे वाहतूक विभागाने बॅरिकेटस लावून सापळाही लावला. परंतू, त्यांना धुडकावत त्याने नितीन कंपनी आणि कोपरी मार्गे पळ काढत सिडको याठिकाणी एका अपंगासह दोघांना अडविले. भन्नाट वेगाने आलेल्या हनी याला सिडको बस थांब्याजवळ काही स्थानिक नागरिकांनी अडवून चांगला चोपही दिला. त्यानंतर त्याला ठाणेनगर पोलिसांच्या हवाली केले. त्याच्या वाहन चालविण्यावरुन तो मद्यपी असल्याचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, त्याने मद्य प्राशन केले नसल्याचे वैद्यकीय तपासणीमध्ये आढळल्याचे ठाणेनगर पोलिसांनी सांगितले. त्याच्या कारच्या धडकेने सिडको बस थांब्याजवळ जाधव हे दुचाकीस्वार जखमी झाले. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याशिवाय, अन्य किरकोळ जखमींपैकी कोणही तक्रार केली नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांनी सांगितले. रेडिओलॉजिस्ट असलेला हनी अलिकडेच रशियातून ठाण्यात आला आहे. त्याने अशा प्रकारे कार का चालविली? याचा तपास करण्यात येत आहे.
*वाहतूक पोलिसांमुळे टळला मोठा अनर्थ
माजीवडा येथून निघाल्यानंतर वागळे इस्टेट वाहतूक पोलिसांनी कोपरी ब्रीज तसेच नितीन कंपनी येथील उड्डाणपूल बंद केला. त्यामुळे त्याने गुरुद्वारामार्गे कोपरीत शिरकाव केला. जर हे मार्ग अडविले नसते तर पूर्व द्रूतगती मार्गाने मुंबईत शिरकाव करुन त्याने आणखी मोठे अपघात केले असते, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

Web Title: A careless radiologist's car blew them up in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.