कारची दोन वाहनांना धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:41 IST2021-04-20T04:41:43+5:302021-04-20T04:41:43+5:30

-------------------------- दुचाकी चोरी कल्याण : पश्चिमेकडील वल्लीपीर रोड परिसरात राहणारे समीर शेख यांनी त्यांची दुचाकी १८ फेब्रुवारीला ते ...

The car hit two vehicles | कारची दोन वाहनांना धडक

कारची दोन वाहनांना धडक

--------------------------

दुचाकी चोरी

कल्याण : पश्चिमेकडील वल्लीपीर रोड परिसरात राहणारे समीर शेख यांनी त्यांची दुचाकी १८ फेब्रुवारीला ते राहत असलेल्या दर्गा चाळीत पार्क केली होती. तेथून ती मध्यरात्रीच्या सुमारास चोरीला गेली आहे. याप्रकरणी शेख यांनी रविवारी बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.

--------------------------------

आंदोलनाचा इशारा

डोंबिवली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मनपाची यंत्रणा कमी पडत असताना प्रभाग अधिकाऱ्यांकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही. इंजेक्शन, बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर सुविधांअभावी रुग्णांची, तसेच नातेवाइकांची परवड होत असून, सात दिवसांच्या आत परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर मनपाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भालचंद्र पाटील यांनी निवेदनाद्वारे केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिला आहे.

------------------------

Web Title: The car hit two vehicles