सीएनजीच्या गळतीमुळे ठाण्यात मोटारीला आग, दोन महिलांसह तिघे बचावले
By जितेंद्र कालेकर | Updated: January 4, 2023 21:14 IST2023-01-04T21:14:01+5:302023-01-04T21:14:09+5:30
सीएनजीच्या गळतीमुळे ठाण्यातील माजीवडा उड्डाणपूलावरील एका मोटारकारला आग

सीएनजीच्या गळतीमुळे ठाण्यात मोटारीला आग, दोन महिलांसह तिघे बचावले
ठाणे: सीएनजीच्या गळतीमुळे ठाण्यातील माजीवडा उड्डाणपूलावरील एका मोटारकारला आग लागल्याची घटना बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. या मोटारीतील चालक मयुर कोळी आणि दोन महिला अशा तिघांची सुखरुप सुटका करण्यात ठाणे अग्निशमन दलाला यश आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. दरम्यान, या घटनेने माजीवडा ते कापूरबावडी जाणाºया माजीवडा उड्डाण पूलावर रात्री आठ ते ९ या दरम्यान वाहतूक कोंडी झाली होती. नंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.