सॉलिटेअर इव्हेंटतर्फे भरणार कार कार्निव्हल
By Admin | Updated: February 16, 2017 01:44 IST2017-02-16T01:44:45+5:302017-02-16T01:44:45+5:30
भव्य कार कार्निव्हल पाहायचा आणि असेल, तर मग चला ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये. १७ ते १९ फेब्रुवारी हे तीन दिवस सॉलिटेअर

सॉलिटेअर इव्हेंटतर्फे भरणार कार कार्निव्हल
ठाणे : भव्य कार कार्निव्हल पाहायचा आणि असेल, तर मग चला ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये. १७ ते १९ फेब्रुवारी हे तीन दिवस सॉलिटेअर इव्हेंट्सतर्फे कार कार्निव्हलचे
आयोजन करण्यात आले आहे. सॉलिटेअर इव्हेंटतर्फे सातत्याने हाय अॅण्ड कारचे प्रदर्शन भरवले जाते. विवियानामध्ये होणारे हे नववे कार कार्निव्हल आहे. लोकमत याचे माध्यम प्रायोजक आहे.
कार्निव्हलचे उद्घाटन १७ फेब्रुवारी रोजी सकाळी होणार असून सकाळी ११ ते ८ या वेळेत रोज कार्निव्हलला भेट देता येईल. १८ फेब्रुवारी रोजी फ्लॅश मॉबचे आयोजन संध्याकाळी ६ वाजता करण्यात आले आहे. १९ फेब्रुवारीला कार्निव्हल थीम परेडचे आयोजन करण्यात आले आहे. ही परेड संध्याकाळी ६ आणि रात्री ८ वाजता असणार आहे.
या कार्निव्हलचे खास आकर्षण आहे दुबई ट्रीपचा लकी ड्रॉ. कपलसाठी हा लकी ड्रॉ असणार आहे. या ड्रॉची सोडत १९ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता काढण्यात येणार आहे. तीनही दिवस वन मिनिट गेम शोचे आयोजन करण्यात आले आहे. तरी, आवर्जून या कार्निव्हलला भेट द्यावी, असे आवाहन सॉलिटेअरच्या गिरीश जैन यांनी केले आहे. (प्रतिनिधी)