बंगालीबाबांना इच्छुक उमेदवार आले शरण, बंगले, फार्महाउसला भेटी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 12:51 AM2019-09-15T00:51:29+5:302019-09-15T00:51:35+5:30

निवडणुकीचा काळ आल्याने सध्या मुंब्य्रातील बंगालीबाबांच्या काही राजकीय नेत्यांच्या बंगले, फार्महाउसवरील भेटीगाठी वाढल्या आहेत.

Candidates interested in Bengalis came to Sharan, Bungalow, Farmhouse visits | बंगालीबाबांना इच्छुक उमेदवार आले शरण, बंगले, फार्महाउसला भेटी

बंगालीबाबांना इच्छुक उमेदवार आले शरण, बंगले, फार्महाउसला भेटी

Next

- कुमार बडदे
मुंब्रा : निवडणुकीचा काळ आल्याने सध्या मुंब्य्रातील बंगालीबाबांच्या काही राजकीय नेत्यांच्या बंगले, फार्महाउसवरील भेटीगाठी वाढल्या आहेत. लाल किंवा काळ्या कपड्यांत बांधलेले तावीज, लिंबू कापून जारणमारण किंवा कागदावर आडवेतिडवे रकाने आखून त्यात सांकेतिक भाषेतील मजकूर लिहून विरोधकांचा बंदोबस्त करण्याकरिता मूठकरणी या प्रकारांची चलती सुरू झाली आहे. मुंब्रा येथील तांत्रिक विद्या प्राप्त असल्याचा दावा करणाऱ्या एका महिलेने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला ही माहिती दिली.
राज्य मंत्रिमंडळातील एक मंत्री रामदास कदम हे बंगालीबाबाला सोबत घेऊन फिरतात, असा आरोप अलीकडेच झाला. त्या पार्श्वभूमीवर बंगालीबाबा व त्यांच्या तांत्रिक विद्येचा राजकारणातील मंडळींशी असलेला संबंध याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता मुंब्रा या बंगालीबाबांचा अधिक वावर असलेल्या शहरातील काही बाबांना सध्या राजकीय नेत्यांकडून मागणी असल्याचे समजले.
राज्य सरकारने जादूटोणाविरोधी कायदा केला असून अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेसारख्या अनेक संघटना अशा बुवाबाजीपासून दूर राहण्यासाठी जनप्रबोधन करीत असतानाही काही राजकीय नेते आपल्या विरोधकांचा बंदोबस्त करण्याकरिता या मार्गाचाही अवलंब करीत आहेत.
निवडणुकीचे तिकीट मिळावे, वरिष्ठ नेत्यांची आपल्यावर कायम मर्जी राहावी, आपली कामे विनासायास व्हावीत, बंगालीबाबा तसेच इतर प्रकारच्या तांत्रिक बाबांना शरण जाण्यात काही गैर नाही, असे बाबांच्या आशीर्वादाकरिता वरचेवर जाणाºया एका नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले.
तांत्रिक विद्या हस्तगत केल्याचा दावा करणाºया एका महिलेने सांगितले की, काळ्या जादूच्या माध्यमातून इच्छित कामे काही दिवस किंवा तासांमध्ये करून देण्याच्या जाहिराती लावण्यावर रेल्वेने बंदी घातली. मात्र, वेगवेगळ्या शहरांमधील गल्लीबोळांमध्ये आजही अशा जाहिराती दिसतात. एखाद्याने इच्छापूर्तीसाठी केलेल्या अथक प्रयत्नानंतरही त्याला यश आले नाही, तर तो शेवटच्या टप्प्यात बाबाकडे जातो. त्याने अगोदरच्या प्रयत्नांमुळे त्याला यश मिळते, परंतु शेवटच्या टप्प्यात बाबाकडे गेल्यामुळे यश मिळाल्याचा त्याचा समज होतो. दरम्यान, उमेदवारी अर्ज कधी भरायचा, प्रचाराचा नारळ कधी फोडायचा, आदी निर्णयांसाठी उमेदवार सल्ला घेतात. बाबाच्या भेटीची कुठेही वाच्यता होऊ नये, यासाठी या भेटी नेत्यांचे बंगले, फार्महाउस वगैरे ठिकाणी होतात. आमच्या भेटीला येताना नेते एकटे येतात किंवा अगदी विश्वासू व्यक्तीला सोबत आणतात, असेही ही महिला म्हणाली.
>तांत्रिक बाबांकडे जाणाºया एका नेत्याने सांगितले की, ‘अनेक बंगालीबाबा घरामध्ये ठेवण्यासाठी काही वस्तू किंवा हातावर बांधण्यासाठी, पाकिटात ठेवण्यासाठी लाल तसेच काळ्या कपड्यात बांधलेले तावीज, गंडेदोरे देतात. काही तांत्रिक लिंबू कापून त्यावर कुंकू, गुलाल व अबीर टाकून विरोधकाला संपवण्याची जारणमारण विद्या वापरतात, तर काही तांत्रिक कागदावर आडवेतिडवे रकाने आखून त्यावर सांकेतिक भाषेत काहीतरी लिहून त्या कागदाची पुंगळी करून ती विरोधकाच्या नावाने जाळण्यास सांगतात. ठेवायला दिलेल्या किंवा जाळण्यासाठी दिलेल्या तावीज अथवा सांकेतिक भाषेच्या कागदावरील मजकुराचा अर्थ काय, याची विचारपूस तांत्रिकांकडे करण्यास परवानगी नाही.’

Web Title: Candidates interested in Bengalis came to Sharan, Bungalow, Farmhouse visits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.