शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

धावपट्टीच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने पोलीस भरतीसाठी आलेले उमेदवार ताटकळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 08:21 IST

धावण्याची परीक्षा असल्याने पहाटेपासून असंख्य उमेदवार हे मैदानाच्या परिसरात जमलेले होते. परंतु धावण्याची परीक्षाच सुरु न झाल्याने प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली.

 मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाची पोलीस भरती सुरु असून शुक्रवारी १०० मीटर धावणेच्या धावपट्टीत तांत्रिक बिघाड झाल्याने धावणे परीक्षा स्थगित करावी लागली. त्यामुळे पहाटेपासून आलेल्या उमेदवारांना त्याचा त्रास सहन करावा लागला आणि दुपारपर्यंत ताटकळत थांबावे लागले. 

सध्या पोलीस आयुक्तालयाची भरती सुरु असून त्यासाठी शारीरिक चाचणी परीक्षा भाईंदरच्या सुभाषचंद्र बोस मैदानात घेतल्या जात आहेत. पोलिसांनी मैदान व परिसरात व्यवस्था केलेली आहे. १०० मीटर धावण्याच्या धावपट्टीवर पोलिसांनी यांत्रिक उपकरणे लावलेली आहेत. मात्र शुक्रवारी ऐन परीक्षेवेळी त्यात बिघाड झाल्याने धावण्याची परीक्षा रखडली. 

धावण्याची परीक्षा असल्याने पहाटेपासून असंख्य उमेदवार हे मैदानाच्या परिसरात जमलेले होते. परंतु धावण्याची परीक्षाच सुरु न झाल्याने प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली. धावण्याची तयारी करून आलेल्या आणि बरेच तास ताटकळत रहावे लागल्याने उमेदवारांमध्ये चलबिचल सुरु झाली. मैदानाच्या बाहेरच नाल्यावरील पदपथावरच ते बसून होते. परीक्षा सुरु होईल याच्या प्रतीक्षेत त्यांना कुठे जाता देखील आले नाही. 

पहाटेपासून दुपारी २ वाजेपर्यंत अनेक उमेदवार हे अन्न - पाण्या वाचून होते. मनसेच्या काही कार्यकर्त्यांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी मैदानाच्या बाहेर जमलेल्या उमेदवारांना पाणी दिले. काहींची तात्पुरती थांबण्याची सोय केली. पोलीस प्रशासनाच्या अपुऱ्या नियोजनामुळे धावणे परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांचे हाल झाले या बद्दल मनसेसह अनेकांनी संताप व्यक्त केला. शुक्रवारच्या महासभेत काँग्रेसचे नगरसेवक अनिल सावंत यांनी देखील पोलीस भरतीसाठी आलेल्या राज्यभरातील उमेदवारांच्या गैरसोयीचा मुद्दा मांडत महापालिकेने उमेदवारांची व्यवस्था करावी अशी मागणी महापौर डिम्पल मेहता यांच्याकडे केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Police recruitment candidates stranded due to track system failure.

Web Summary : Police recruitment drive stalled in Mira-Bhayandar due to technical issues with the running track. Candidates faced significant delays, waiting for hours without food and water. MNS provided assistance. Congress raised concerns about candidate welfare.
टॅग्स :Policeपोलिस