चला, श्रावण साजरा करू या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:38 IST2017-07-31T00:38:29+5:302017-07-31T00:38:29+5:30

श्रावण महिना आला की सणवार आलेच. या सणवारांना आणखी खास करण्यासाठी मागील वर्षापासून मिती क्रिएशन्सतर्फे ‘श्रावण महोत्सव’ या भव्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

calaa-saraavana-saajaraa-karauu-yaa | चला, श्रावण साजरा करू या...

चला, श्रावण साजरा करू या...

मुंबई : श्रावण महिना आला की सणवार आलेच. या सणवारांना आणखी खास करण्यासाठी मागील वर्षापासून मिती क्रिएशन्सतर्फे ‘श्रावण महोत्सव’ या भव्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. गेल्या वर्षी मुंबईतील १३ महिला मंडळांतून ही स्पर्धा घेण्यात आली. या पाककला स्पर्धेला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
मुंबईत प्रथमच आंतर महिला मंडळ पाककला स्पर्धा घेण्यात आली होती. विजेत्या १५ महिलांना आॅर्किडमध्ये विठ्ठल कामत यांनी खास आमंत्रित केले होते. भरभरून बक्षिसे, श्रावणातील गाणी, खेळ आणि सेलिब्रिटी गप्पा असा अंतिम सोहळा रंगतदार झाला होता.
या वर्षी पुन्हा ‘श्रावण महोत्सव २०१७ - किचन क्वीन’ या पाककला सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दादर, गोरेगाव, बोरीवली, ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई या सहा केंद्रांवर ही स्पर्धा होणार आहे. या वैशिष्ट्यपूर्ण ‘श्रावण महोत्सवा’चे ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक आहेत.
श्रावण महिन्यात सणवार असल्याने अनेकांचे उपवास असतात. मागील वर्षी महिलांनी बटाट्याशिवाय वडा आणि श्रावणातील पारंपरिक पदार्थ बनवले. या वर्षी ‘उपवासाचा पदार्थ - पण जरा हटके’ हा स्पर्धेचा विषय आहे. नेहमीच्या साबुदाणा खिचडी, बटाट्याची भाजी, साबुदाणा-वडे या उपवासाच्या पदार्थांना आधुनिकतेची जोड देत ‘जरा हटके’ साज कसा चढवाल..! ही या स्पर्धेची खरी गंमत आहे. दिलेला पदार्थ महिलांनी घरीच बनवून आणायचा आहे व त्याची मांडणी स्पर्धेच्या ठिकाणी येऊन करायची आहे.
शेफ तुषार प्रीती देशमुख श्रावण महोत्सवाच्या प्राथमिक फेºयांचे मुख्य परीक्षक आहेत. एकूणच पदार्थांच्या चवीवर आणि सादरीकरणावर स्पर्धेचा निर्णय अवलंबून असेल.
परीक्षकांचा निर्णय हा अंतिम मानला जाईल. या स्पर्धेची प्राथमिक फेरी प्रत्येक केंद्रावर नेमलेल्या हॉलमध्ये घेतली जाईल. प्राथमिक फेरीतून प्रत्येक सेंटरमधून १० महिलांची निवड केली जाईल.
या १० विजेत्या महिलांना ‘मदर्स रेसिपी’तर्फे आकर्षक गिफ्ट हॅम्पर्स दिले जाईल. शिवाय उपस्थित सर्व महिलांना लकी ड्रॉच्या माध्यमातून तन्वी हर्बल्स, पितांबरी रुचियाना
गूळ, फोंडाघाट फार्मसी, ज्योविज स्कीम क्लिनिक, साडीघर
यांची आकर्षक गिफ्ट हॅम्पर्स
दिली जातील. या स्पर्धेची निर्मिती उत्तरा मोने यांच्या मिती क्रिएशन्सची आहे.

Web Title: calaa-saraavana-saajaraa-karauu-yaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.