फेरीवाल्यांबरोबर केक कापणारा लिपिक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:47 IST2021-09-04T04:47:40+5:302021-09-04T04:47:40+5:30

ठाणे : फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ल्याची ताजी असतानाच, त्याच्या दुसऱ्याच ...

Cake-cutting clerk suspended with hawkers | फेरीवाल्यांबरोबर केक कापणारा लिपिक निलंबित

फेरीवाल्यांबरोबर केक कापणारा लिपिक निलंबित

ठाणे : फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ल्याची ताजी असतानाच, त्याच्या दुसऱ्याच दिवशी फेरीवाल्यांबरोबर केप कापून आपला वाढदिवस साजरा ठाणे महापलिकेच्या नौपाडा प्रभाग समितीच्या अतिक्रमण व निष्कासन विभागातील विवेक महाडिक या लिपिकाला चांगलेच महागात पडले आहे. त्याच्यावर महापलिका आयुक्तांनी शिस्तभंगासह निलंबनाची कारवाई केली आहे.

पिंपळे यांच्यावर सोमवारी सायंकाळी जीवघेणा हल्ला झाला. त्यात त्यांच्या हाताची दोन बोटे कापल्या गेली, तर त्यांच्या सुरक्षारक्षकाचेही एक बोट कापले गेले. त्यानंतर महापालिकेेने फेरीवाल्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू गेली आहे. त्यानुसार शहराच्या विविध भागात रस्ते, फूटपाथ अडविणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे. परंतु, ही कारवाई सुरू असताना नौपाडा प्रभाग समितीच्या अतिक्रमण व निष्कासन विभागातील विवेक महाडिक या लिपिकाचा फेरीवाल्यांबरोबर केक कापून वाढदिवस साजरा करण्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आयुक्तांनी ही कारवाई केली.

Web Title: Cake-cutting clerk suspended with hawkers