शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातून वीज वितरण कंपनीची केबल चोरणारी टोळी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 22:45 IST

राज्य वीज वितरण कंपनीचे तीन लाख रुपयांचे केबल चोरणाऱ्या राजू ठाकूर (५२, रा. सावरकरनगर, ठाणे) याच्यासह पाच जणांच्या टोळीला कापूरबावडी पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास अटक केली.

ठळक मुद्देकापूरबावडी पोलिसांची कामगिरी एक लाखाचे केबल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्य वीज वितरण कंपनीचे तीन लाख रुपयांचे केबल चोरणाऱ्या राजू ठाकूर (५२, रा. सावरकरनगर, ठाणे) याच्यासह पाच जणांच्या टोळीला कापूरबावडी पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्यांच्याकडून एक लाख रुपयांची केबल हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.कापूरबावडी येथील हायस्ट्रीट मॉलच्या पाठीमागे असलेल्या एका नाल्यातून राज्य वीज वितरण कंपनीच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीवरील आवरण काढून त्यातील तीन लाख रुपययांचे तांबे आणि गॅव्हनाइज स्टील काढून ते चोरी झाल्याची तक्रार १३ नोव्हेंबर रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात वीज वितरण कंपनीने दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन वरिष्ठ पोलीस उत्तम सोनवणे, निरीक्षक प्रियत्तमा मुठे आणि संजय निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे यांच्या पथकाने खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे राजू याच्यासह करण मुकणे (१९, रा. कापूरबावडी, ठाणे), सोमनाथ लिंबाडे (५२, रा. धर्मवीरनगर, ठाणे), माणिक पंचवडे (२७, रा. सावरकरनगर, ठाणे) आणि पवन पवार (२४, रा. धर्मवीरनगर, ठाणे) या चौघांना रविवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास अटक केली. त्यांच्याकडून एक चाकू, कटर आणि एक लाख रुपयांचे केबलचे गॅल्व्हनाइज स्टील, असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यातील सर्व आरोपींना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांनी आणखी अशा प्रकारे कुठे चोऱ्या केल्या आहेत का, चोरीतील उर्वरित केबलची कुठे विल्हेवाट लावली, या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक