शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

सीए आत्महत्या प्रकरणाला कलाटणी: ब्लॅकमेल करीत दिड कोटींची रक्कम लुबाडल्यामुळेच वडिलांची आत्महत्या

By जितेंद्र कालेकर | Updated: March 29, 2021 21:04 IST

बारबालेसह तिच्या अन्य दोन बहिणींनी ब्लॅकमेल करीत गेल्या काही दिवसांमध्ये दीड कोटींची रक्कम उकळल्यामुळेच वडिलांनी आत्महत्या केल्याची तक्रार शोभराज यांचा मुलगा साहिल (२३) याने कापूरबावडी पोलीस ठाण्यात रविवारी रात्री केली आहे.

ठळक मुद्दे मुलाची बारबालेसह तिच्या बहिणींविरुद्ध तक्रारया प्रकरणाला कलाटणी मिळाल्याने पोलीसही चक्रावले

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वारंवार पैशांची मागणी करणाऱ्या बारबालेवर खुनी हल्ला करुन शोभराज राघनी (५४) या लेखापालाने (सीए) हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली होती. मात्र, या बारबालेसह तिच्या अन्य दोन बहिणींनी ब्लॅकमेल करीत गेल्या काही दिवसांमध्ये दीड कोटींची रक्कम उकळल्यामुळेच वडिलांनी आत्महत्या केल्याची तक्रार शोभराज यांचा मुलगा साहिल (२३) याने कापूरबावडी पोलीस ठाण्यात रविवारी रात्री केली आहे. या प्रकरणाला कलाटणी मिळाल्याने पोलीसही चक्रावले आहेत.कल्याणच्या खडकपाडा, वायलेनगर येथे राहणाºया साहिल शोबराज याने २८ मार्च २०२१ रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात यासंदर्भात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आपल्या तक्रारीमध्ये त्याने म्हटले आहे की, ठाण्यातील सावरकरनगर येथील पाटीलवाडी भागात राहणारी मुमताज उर्फ नलिनी शर्मा तसेच तिच्या अन्य दोन बहिणी पिया आणि कमल (तिघींच्याही नावात बदल केला आहे) यांनी २०१६ ते २३ मार्च २०२१ या कालावधीमध्ये शोभराज यांना वारंवार ब्लॅकमेल करुन त्यांना मानसिक त्रास दिला. या काळात त्यांच्याकडून तब्बल दीड कोटींची रक्कम लुबाडली आहे. या तिघींकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून शोभराज यांनी हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीतून उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांना ही आत्महत्या करण्यास या तिघीेंनी प्रवृत्त केले.* काय घडला होता प्रकार-वारंवार पैशांची मागणी करणाºया बारबालेवर चाकूने खुनीहल्ला करून शोभराज यांनी स्वत:ही बाळकूम येथील रेसिडेन्सी हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीतून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ मार्च रोजी सायंकाळी घडली होती. याप्रकरणी शोभराज यांच्याविरु द्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा २४ मार्च रोजी दाखल झाला होता.शोभराज यांचे या ३३ वर्षीय बारबालेशी अनैतिक संबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती त्यांच्याकडे पैशांची मागणी करीत होती. यातूनच झालेल्या वादातून त्याने ठाण्यातील बाळकूमनाका येथील रेसिडेन्सी हॉटेलमधील एका खोलीत तिच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर स्वत: खिडकीतून उडी घेऊन आत्महत्या केली होती.दरम्यान, खूनाचा प्रयत्न आणि आत्महत्या या दोन्ही प्रकरणामध्ये आरोपीचा मृत्यु झाल्यामुळे न्यायालयात अबेटेड समरी सादर केली जाणार आहे. मात्र, आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात बारबालेसह तिघींची चौकशी केली जाणार असून गरज पडल्यास त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी