प्रभाग १९ अ ची पोटनिवडणूक १७ एप्रिलला

By Admin | Updated: March 29, 2016 03:23 IST2016-03-29T03:23:33+5:302016-03-29T03:23:33+5:30

प्रभाग क्र. १९ अ चे शिवसेना नगरसेवक लॉरेन्स डिसोझा यांचे नगरसेवकपद रद्द झाल्यानंतर या प्रभागात येत्या १७ एप्रिलला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे देवराम

The bypolls of Ward 19A are on April 17 | प्रभाग १९ अ ची पोटनिवडणूक १७ एप्रिलला

प्रभाग १९ अ ची पोटनिवडणूक १७ एप्रिलला

ठाणे : प्रभाग क्र. १९ अ चे शिवसेना नगरसेवक लॉरेन्स डिसोझा यांचे नगरसेवकपद रद्द झाल्यानंतर या प्रभागात येत्या १७ एप्रिलला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे देवराम भोईर यांनी आपला एकमेव उमेदवारी अर्ज भरला आहे. अर्ज भरण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना शिवसेनेकडून अद्याप उमेदवारी अर्ज भरलेला नाही. परंतु, शिवसेनेकडून दोघांनी अर्ज घेतल्याने त्यापैकी कोण उमेदवार निश्चित होणार, हे शेवटच्या म्हणजेच मंगळवारी निश्चित होणार आहे.
माजिवडा प्रभाग १९ अ मधून शिवसेनेच्या तिकिटावर लॉरेन्स डिसोझा हे निवडून आले होते. त्यांनी माजी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते देवराम भोईर यांचा निसटता पराभव केला होता. त्यानंतर, डिसोझा यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरवून ते सरकारजमा करण्याचे आदेश विभागीय जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने दिले होते. त्यानंतर, येत्या १७ एप्रिलला या प्रभागात पोटनिवडणूक होऊ घातली असून सोमवारी राष्ट्रवादीकडून देवराम भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या वेळी त्यांच्यासमवेत विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, प्रदेश महिला अध्यक्ष चित्रा वाघ, माजी खासदार संजीव नाईक, आमदार निरंजन डावखरे, विरोधी पक्षनेते संजय भोईर, माजी महापौर अशोक राऊळ, नगरसेवक भय्यासाहेब इंदिसे, सुहास देसाई आदी उपस्थित होते. सेनेकडून माजी नगरसेवक रवींद्र पाटील आणि भारतीय विद्यार्थी सेनेचे संघटक सचिव सुनील पाटील यांनी सोमवारी अर्ज तर नेले परंतु, यापैकी कोणाला संधी शिवसेना देणार, हे आता मंगळवारीच स्पष्ट होणार आहे.

अवघ्या सहा महिन्यांसाठी मिळणार नगरसेवकपद
अवघ्या सहा महिन्यांसाठी हे नगरसेवकपद मिळणार असल्याने उमेदवार उभा करावा की नाही, याबाबत शिवसेनेमध्ये चाचपणी सुरू आहे. दोघांनी अर्ज जरी नेले असले तरी अवघ्या सहा महिन्यांवर सार्वत्रिक निवडणूक आल्याने आता उमेदवार कशाला उभा करायचा, अशी चर्चा सध्या शिवसेनेमध्ये सुरू आहे. त्यामुळे कदाचित शिवसेना या पोटनिवडणुकीत माघार घेण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तसे झाल्यास देवराम भोईर हे बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे.

Web Title: The bypolls of Ward 19A are on April 17

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.