पोटनिवडणूक होणार बिनविरोध?

By Admin | Updated: March 24, 2017 01:02 IST2017-03-24T01:02:53+5:302017-03-24T01:02:53+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे प्रभाग क्रमांक ४६ कांचनगाव-खंबाळपाडाचे भाजपाचे नगरसेवक शिवाजी शेलार यांचे निधन झाल्याने

Bye-election will be uncontested? | पोटनिवडणूक होणार बिनविरोध?

पोटनिवडणूक होणार बिनविरोध?

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे प्रभाग क्रमांक ४६ कांचनगाव-खंबाळपाडाचे भाजपाचे नगरसेवक शिवाजी शेलार यांचे निधन झाल्याने त्यांच्या प्रभागात पोटनिवडणूक जाहीर झाला आहे. १९ एप्रिलला होणाऱ्या या निवडणुकीसाठी शेलार कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. त्याला अन्य राजकीय पक्षांचाही पाठिंबा मिळण्याचे संकेत आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.
शिवाजी शेलार यांचे ४ डिसेंबरला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शेलार हे स्थायी समितीचे सदस्यही होते. स्थायीच्या त्यांच्या रिक्त जागेवर उपेक्षा भोईर यांची वर्णी लागली आहे. दरम्यान, शेलार यांच्या प्रभागात आता पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीसाठी २७ मार्च ते ३ एप्रिलदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. उमेदवारी अर्जाची छाननी ५ एप्रिलला होणार आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी ७ एप्रिलचा दिवस निश्चित करण्यात आला आहे. निवडणुकीचे मतदान १९ एप्रिलला होणार असून मतमोजणी २१ तारखेला होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bye-election will be uncontested?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.