शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

चायना बनावटीच्या सिम बॉक्सची एक लाख ४० हजारांमध्ये खरेदी,  आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2017 10:17 PM

भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज प्रकरणातील दहा आरोपींची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. त्यांची सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर भिवंडी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली.

 ठाणे - भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज प्रकरणातील दहा आरोपींची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. त्यांची सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर भिवंडी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली.वसीम शेखसह त्याच्या साथीदारांनी नियाज शेख याच्यासह दहा जणांच्या टोळक्याकडून ३० ते ३५ हजार रुपये कमिशनचे अमिष दाखवून सिम बॉक्स मशिन भिवंडीतील या अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजमध्ये बसविले होते. ही चायना बनावटीची गेटवे मशिन (सिम बॉक्स ) एक लाख ४० हजारांमध्ये आॅनलाइन खरेदी केल्याची माहिती या आरोपींच्या पोलीस चौकशीत उघड झाली. त्यामुळे ही सर्व २६ मशिन्स ३६ लाख ४० हजारांमध्ये खरेदी केल्याची माहिती उघड झाली. यातून ही टोळी महिन्याला लाखो रुपये कमाई करीत होती. नियाज शेख, मोहमंद मोमीन, नदीम शेख, महंमद उमर खान, महंमद अर्शद शेख, फुजैल शेख, समशाद अन्सारी, फकेआलम शेख, आलीम शेख आणि समशेर शेख या सर्व आरोपींची २३ आॅक्टोबर रोजी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना सोमवारी भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यातील नियाज शेख सह नऊ जणांना वरीष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत आणि सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या पथकाने ११ आॅक्टोबर रोजी अटक केली होती. तर समशेर शेख याला १३ आॅक्टोबर रोजी अटक केली होती. या दहा जणांकडे या गुन्ह्याच्या चौकशीची गरज असल्याने त्यांना आणखी दोन दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने मात्र आधीच १४ दिवसांची पोलीस कोठडी दिल्यामुळे त्यात आणखी वाढ करण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हा