शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांची चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 06:35 IST

एक कोटी २० लाखांची १२ वाहने हस्तगत : ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, मुंबईच्या वाहनांची हैदराबादमध्ये विक्री

जितेंद्र कालेकरठाणे : मुंबई, ठाण्यातून वाहनांची चोरी करणाºया आंतरराज्य टोळीचा ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. सुनील चौरसिया याच्यासह सात जणांना यात अटक केली असून त्यांच्याकडून एक कोटी २० लाखांची महागडी वाहने हस्तगत केली आहेत. ठाणे शहर, ग्रामीण आणि मुंबई परिसरातून चोरलेली वाहने ही टोळी महाराष्ट्राबाहेर कमी किमतीमध्ये विकत असल्याचे तपासामध्ये उघड झाले आहे.

काशिमीरा, मीरा-भार्इंदर भागांतून इनोव्हासारख्या महागड्या कार तसेच इतर वाहनचोरीचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण सोपवले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली काशिमीरा युनिटचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख आणि उपनिरीक्षक अभिजित टेलर यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि खबºयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सुनील चौरसिया, रणजीत चौधरी (रा. उत्तर प्रदेश), चिमाणी, सलदी राजा, भवरलाल चौधरी आणि चुणस श्रीनू (रा. आंध्र प्रदेश) अशा सात जणांना अटक केली आहे. रणजीत याच्याविरुद्ध मुंबई, पुणे आणि ठाणे परिसरांत वाहनचोरीचे २९ गुन्हे दाखल आहेत. तर, श्रीनू याच्याविरुद्ध आंध्र प्रदेशमध्ये रक्तचंदनचोरीचे १० गुन्हे दाखल आहेत. २००९ ते २०१४ या दरम्यानच्या इनोव्हा कारवर या टोळीचे लक्ष असायचे. मुंबई, ठाण्यातून चोरलेली १४ ते १५ लाखांची इनोव्हा कार ते अवघ्या दीड ते दोन लाखांमध्ये हैदराबाद तसेच आंध्र प्रदेशमध्ये विक्री करत होते. कलम ३७९ च्या चोरीच्या गुन्ह्यात एखाद्या आरोपीला चार ते सात दिवसांची पोलीस कोठडी दिली जाते. पण, या गुन्ह्याचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेऊन ठाणे न्यायालयाने या एक महिन्यापूर्वी अटक झालेल्या यातील आरोपींची कोठडी २७ दिवसांपर्यंत वाढवली. चेसीस क्रमांकही बदलले जात होते. त्यामुळे या वाहनांच्या चोरीचा छडा लावणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तरीही, मोठ्या कौशल्याने यातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाºयांनी अटक केली. तुळिंज पोलिसांनी चार, तर काशिमीरा युनिटने आठ अशी १२ वाहने या टोळीकडून हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अशी होती चोरीची ‘एमओबी’भंगारमध्ये टाकलेल्या वाहनांच्या इंजिनांचा क्रमांक ते या चोरीच्या वाहनाला वापरत होते. हा क्रमांक चोरीच्या वाहनाला लावल्यानंतरहे वाहन ते परराज्यात विक्री करत असल्याचेही तपासामध्ये उघड झाले आहे. आंध्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश किंवा बिहार येथून भंगार किंवा अपघातग्रस्त गाडीची ही टोळी अगदी नाममात्र किमतीमध्ये खरेदी करत असत. अशा प्रकारची पांढºया रंगाची इनोव्हा कार खरेदी केली की, मुंबईतून त्यांच्या साथीदाराला पांढºया रंगाच्या २०१४ च्या मॉडेलची आॅर्डर मिळायची. ही आॅर्डर मिळाली की, टोळीतील तिसरी व्यक्ती अशी गाडी हेरून ठेवायची. मग, त्यांच्यातील रणजीत चौधरी हा दहिसर भागातील गाडी वसई, विरार, नवी मुंबई किंवा घोडबंदर रोड भागात आणून ठेवायचा. ४८ तास गाडीकडे कोणीही आले नाही की, ती गाडी आॅर्डर असेल तिथे हैदराबादकडे पाठवली जायची. ती पुणे, सोलापूर, नाशिक या भागांतून हैदराबाद येथून अपघातग्रस्त किंवा भंगारातील गाडीची कागदपत्रे घेऊन आलेल्या याच टोळीतील व्यक्तीकडे मुंबईच्या मध्यस्थामार्फत सोपवली जायची.२०१४ पर्यंतच्या गाड्यांना मागणी२००९ ते २०१४ या काळातील काही कारला डोअर लॉक आणि इग्निशनची चावी एकच होती. त्यामुळे या कार चोरी करण्यासाठी सोप्या होत्या.२०१४ नंतरच्या कारला डोअर आणि इग्निशनचे लॉक वेगळे असल्यामुळे ते उघडणे या टोळीला अवघड असल्यामुळे २०१४ च्याच गाड्या ही टोळी हेरत होती.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी