व्यापारी देणार भाजपाला पाठिंबा
By Admin | Updated: February 8, 2017 04:05 IST2017-02-08T04:05:40+5:302017-02-08T04:05:40+5:30
ठाण्यात व्यापाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महेंद्र जैन यांनी अपक्ष म्हणून प्रभाग क्र. २२

व्यापारी देणार भाजपाला पाठिंबा
ठाणे : ठाण्यात व्यापाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महेंद्र जैन यांनी अपक्ष म्हणून प्रभाग क्र. २२ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, आता पक्ष हितासाठी उमेदवारी मागे घेत असल्याचे जाहीर करून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. आता ते भाजपाला पाठिंबा देणार आहेत. या प्रभागातून भाजपचे निलेश कोळी आणि नम्रता कोळी यांनीसुद्धा आपले अर्ज मागे घेतल्याने पक्षाच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे शहराच्या इतर भागातदेखील अनेक बंडोबांनी आपले बंड शमविले असून निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे.
ठाण्यात प्रथमच उमेदवारी मिळण्यावरुन भाजपात राडा झाला होता. परंतु, तरीदेखील अनेक निष्ठावंतांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडाचे झेंडे हाती घेऊन भाजपाच्या विरोधात भूमिका घेत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अनेक ठिकाणी अपक्ष म्हणूनही अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
दरम्यान, प्रभाग क्र मांक २२ येथून भाजपने विकास दाभाडे, रु पाली साळवी, नम्रता कोळी आणि मिलिंद साळवे यांना उमेदवारी दिली आहे. या भागातून व्यापाऱ्यांना प्रतिनिधीत्व द्यावे, अशी मागणी व्यापारीवर्गाने केली होती. मात्र, सेना आणि भाजपनेही व्यापाऱ्यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे नाराज झालेल्या व्यापारी समाजाच्या कोअर कमिटीचे सदस्य आणि जैन मंदिर समितीचे अध्यक्ष महेंद्र जैन अपक्ष निवडणूक रिंगणात उतरले होते. मात्र, आपली नाराजी आता मिटली असून व्यापक हितासाठी आपण अर्ज मागे घेत असल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यात ३४ हजार व्यापाऱ्यांचे कुटुंब असून आता आम्ही भाजपा सोबत असू असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)